Monthly Archives: मे 2011

शेतकरी आणि नदी

एका शेतकऱ्याला एक नदी उतरून जावयाचे होते. म्हणून, पाण्यास उतार कोठे आहे हे पाहण्यासाठी तो नदीच्या काठी खाली वर फिरू लागला. काही वेळाने तो म्हणतो, ‘जेथे पाणी संथपणाने वाहते, तेथे ते फार खोल आहे आणि जेथे पाण्याचा मोठा खळखळाट ऐकू येतो, तेथे ते अगदी उथळ आहे !’

तात्पर्य:- स्तब्ध राहणारा मनुष्य बहुधा आतल्या गाठीच्या असल्यामुळे प्रसंगी त्याजकडून जसा धोका पोचण्याचा संभव असता, तसा बडबडया आणि उघडया मनुष्याकडून नसतो.