Monthly Archives: ऑक्टोंबर 2012

कोलंबीचा पुलाव

साहित्य :

  • १ वाटी साफ केलेली कोलंबी
  • १ वाटी मटारचे दाणे
  • ३ वाट्या बासमती किंवा दिल्ली राईस
  • २ कांदे
  • ७-८ लसूण पाकळ्या
  • हळद
  • ४ लवंगा
  • ४ वेलदोडे

मसाला वाटण :

  • २ चमचे धणे
  • २ चमचे खसखस
  • १ चमचा शहाजिरे
  • १०-१२ काळी मिरे
  • २-३ दालचिनीचे तुकडे
  • १०-१२ लाल मिरच्या
  • १०-१५ काजू

कृती :

कोलंबीचा पुलाव

कोलंबीचा पुलाव

लसूण बारीक वाटून घ्यावी. नंतर थोडीशी हळद व वाटलेली लसूण कोलंबीला लावून ठेवावी.

कांदा चिरुन घ्यावा व मसाला बारीक वाटून घ्यावा.

एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून लवंग-वेलदोड्याची फोडणी करावी. नंतर त्यात मटारचे दाणे व कोलंबी घालून जरा परतावे.

नंतर त्यात २-३ तास अगोदर धुतलेले तांदुळ घालून परतावे. तांदुळाच्या दुप्पट गरम पाणी घालून मीठ व वाटलेला मसाला घालावा.

नंतर मंदाग्नीवर भात शिजू द्यावा. पुलाव तयार झाल्यावर त्यावर एक चमचा साजूक तूप घालावे व एका लिंबाचा रस घालून गरम गरम वाढावा.