साहित्य:
- १ गाजर
- १ टॉमेटो
- १ काकडी
- १ कांदा
- १ मुळा
- २ बीट
- २ ढोबळी मिरची
- २ मोठे चमचे मध
- १ लिंबू
- १/२ लहान चमचा मीठ
- १/२ लहान चमचा काळी मिरी पावडर
कृती:
गाजर, काकडी, कांदा, मुळा व बीट सोलून गोल तुकडे करा. टॉमेटो व ढोबळी मिरची पण गोल चिरा. एका बाऊल मध्ये सर्व साहित्य एकत्र करा व लिंबू टाकून वाढा.