आसामी असंतोष

आसामी असंतोष

आसामी असंतोष

आसाम मधील हिसांचाराच्या पार्श्वभूमीवर मूंबईत सी.एस.टी वर झालेली दंगल, पुण्यात ईशान्य भारतीय विदयार्थ्यावर झालेला हल्ला, म्हैसूरमध्ये तिबेटी विदयार्थ्यावर झालेला हल्ला यामुळे पुणे, बेंगळुर, हैद्राबाद या शहरातील ईशान्य भारतीयांची आपल्या गावाकडे परत जाण्यासाठी रीघ लागली. पोलिसांनी, प्रशानाने वारंवार हमी देऊनही या अनेक नागरिकांनी परतीची वाट धरणे पसंत केले. का त्यांना त्यांच्या देशात सुरक्षीत वाटत नाहीये? का पोलिस आणि प्रशासन त्यांचे मतपरिवर्तन करु शकलॆ नाहित? याची कारणंही तशीच आहेत. इतिहासात जर डोकावले तर याची उत्तरं आपसुकचं मिळतात.

भारताच्या ईशान्यकडच्या राज्यात नेहमीच हिंसाचार, असंतोष धुमसत असतो. हा प्रदेश नेहमीच दुर्लक्षित असल्यामुळे उर्वरित भराताला याची कधीच झळ पोहचली नाही. पण यावेळी मात्र आसाममधील हिंसाचाराचे पडसाद थेट मुंबईत उमटल्याने प्रशासनासह प्रसारमाध्यमे खडबडून जागी झाली. भारताच्या ईशान्यकडील सात राज्ये आसाम, मणिपुर मिझोराम, त्रिपुरा, नागालॅंण्ड, मेघालय “seven sisters’ (सप्तभगिनी ) म्हणुन ओळखली जातात. हा भाग नेहमीच मुख्य प्रवाहापासुन वेगळा राहिला आहे. या प्रदेशाच्या राजकीय, सामाजिक हालचालींचा सामान्य माणसाला गंधही नसायचा, प्रसारमाध्यमांचही कव्हरेज तथास्तुच असायचं. अलिकडे परिस्थिती बदलली आहे परंतू अजुन प्रयत्न होणॆ आवश्यक आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा ईशान्य कडे तीनच राज्ये असत्तिवात होती. आसाम, त्रिपुरा, मणिपुर. स्वातंत्र्यत्तोर कालखंडात आसामच्याच मुळच्या प्रातांत चार नविन राज्ये असत्तित्वात आली. या राज्यांमध्ये हिंदु आणि ख्रिस्ती हे प्रमुख धर्म आहे. या प्रदेशात आदिवासी जमातींची संख्या २५० असून १९० भाषा आणि उपभषा इथं बोलल्या जातात. या सातही राज्यांत सगळ्याच बाबतीत प्रचंड वैविध्य आहे. या राज्यांवर निर्सगाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे म्हणुनच या राज्यांना ‘paradise unexplored’ असं म्हणतात. मुबलक पाणी आणि सुपीक जमीन इथं आहे. इथल्या सामान्य माणुस मृदू आणि संथ प्रवृत्तीचा आहे, वन्यजीव तसेच जगंल, दऱ्या- ख्रोऱ्यांच्या हा प्रदेश एकूणच निर्सग संपन्न आहे. पण सततच्या हिंसाचारामुळे इथं परदेशी पर्यटकांना प्रवेश मर्यादित आहे त्यामुळे इथल्या पर्यटनावरही परीणाम झाला आहे. चहाचे मळे,कच्चे तेल हस्तकला, सिल्क उत्पादन हे इथले प्रमुख उदयोग. एवढं असुनही या राज्यांमध्ये अस्थिरता आहे, असतोंष आहे. नक्षलवादाने तर आसाम कायम धुमसत राहिला आहे. ही राज्यं अनेक समस्यांनी वेढली आहे. मुख्य प्रवाहापासुन आपल्याला वेगळे ठेवले जात असल्याची या राज्यांची भावाना आहे. हा प्रदेश दुर्गम आहे घनदाट जंगल, अविकसित दळवळणांची साधनं, गरिबी, बेकारी, स्थानिक जनतेतील राजकीय असंतोष, केंद्राकडुन मिळाणारी दुय्यमतेची वागणूक अशा अनेक समस्या आहेत. national socialist council of naagaaland, meitei Extimist, Tripura Tiger Force, National liberation of tripura या ईशान्य भारतातल्या संघटना तर भारतापासून स्वतंत्र होण्याची मागणी करत आहे.

हा प्रदेश भुटान ,चीन , बांग्लादेश, तिबेट या देशांच्या सिमांनी वेढला गेला आहे. अंतर्गत सिमा प्रश्नांबरोबरच या देशांबरोबर सिमावाद आहेत. आदिवासी जमातींमधील वाद तसेच तिबेट, बांग्लादेश, थायलंड, बर्मा या देशांतुन सतत घुसखोरी होत असते. १९७१ च्या बांग्लादेशच्या निर्मितीनंतर कामासाठी निर्वासितांचे लोंढे इथं येऊन वास्तव्य करू लागले. यात प्रामुख्याने बांग्लादेशी मुस्लिम होते. राजकारण्यांनी मतांचे राजकारण करण्यासाठी बांग्लादेशी मुस्लिमांचा फायदा घेतला. निर्वासितांचे लोढें येतेच राहिल्याने मूळ रहिवासी आणि निर्वासित यातली रेषा धुसर झाली आणि मुळच्या आसामींना त्याच्याच राज्यांत परके होण्याची वेळ आली. यातुनच वाद निर्माण होऊन आसाम धगधत राहिला.

गुरख्यापांसुन ते कार्यालयात काम करणाऱ्या या ईशान्य भारतीयांना आपण शाहनिशा न करता सहजतेने नेपाळी किंवा चिनी म्हणतो. ही त्यांची उपेक्षाच नव्हे काय? स्वत:च्याच देशात उपेक्षित असणारे या ईशान्य भारतीयांना आता स्वत:च्याच प्रांतात असत्तित्वासाठी लढा दयावी लागत आहे. कदचित म्हणुनच सुरक्षतेतीची हामी देऊनही आज ईशान्य भारतीय परतीचा प्रवास करत आहेत.

1 thought on “आसामी असंतोष

  1. dnyaneshwar barate

    बेकायदेशीर पद्धतीने भारतात राहणार्‍या बांग्लादेशी नागरीकांस, भारत सरकारने त्यांना त्यांच्या देशात परत पाठविण्यासाठी कठोर पाऊले उचलने गरचेचे आहे, असे न झाल्यास भारतावर पुन्हा परकियांची सत्ता येण्यास उशीर लागणार नाही.

Comments are closed.