आवळा सरबत

साहित्य :

  • आवळ्याचा रस १ लि.पाणी
  • २ कि.साखर
  • अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड
  • अर्धा चमचा KMS पोटॅशियम मेटाबाय सल्फाइड

कृती :

आवळे शिजवून घ्यावेत. बिया काढाव्यात व मिक्सरमधून काढावे. १ लि. पाणी येऊन हे पाणी,साखर आणी सायट्रिक अ‍ॅसिड एकत्र करून गॅसवर उकळी आणावी. एक उकळी आल्यावर गॅस बंद करावा व सिरप गार झाल्यावर त्यात आवळ्याचा रस मिक्स करावा. अर्धा चमचा पोटॅशियम मेटाबाय सल्फाइड घालावे. सरबत देताना पाव भाग सिरप, पाऊण भाग पाणी, चवीनुसार मीठ घालून द्यावे. सिरप बाटलीत भरताना गाळून भरावे.