अभिषेक

अभिषेकाच्या वेळी निरनिराळ्या देवतांकरिता म्हणावी लागणारी सूक्ते.
विष्णु -पवमान, पुरुषसूक्त, विष्णूसूकत.
शंकर-रुद्र, महिम्नस्तोरे, रुद्रास
श्रीगणपती – ब्रह्मणस्पतिसूक्त, गणपत्यथर्वशीर्ष.
सूर्य- सौरसूक्त किंवा पुरुषसूक्त.
श्रीलक्ष्मीदेवि -श्रीसूक्त, लक्ष्मीसूक्त.
श्रीमल्हारी ऊर्फ खंडोबा- रुद्र,महिम्नस्तोत्र.
श्रीमारुती- रुद्र, महिम्नस्तोत्र.
श्रीदुर्गादेवी भवानी- श्रीसूक्त
श्रीदत्तात्रेय- पवमान किंवा पुरुषसूक्त.
श्रीनरसिंह – पवमान किंवा पुरुषमूक्त.
राम – पवमान किंवा पुरुषसूक्त.
कृष्ण- पवमान किंवा पुरुषसूक्त.
अभिषेक या शब्दाचा अर्थ अभिषेकपात्रात जल म्हणजे पाणी घालून त्याची धार संतत देवावर धरणे.
एकादशनी याचा रूढ अर्थ रुद्राची ११ नमक आवतंने म्हणणे व प्रत्येक नमक आवतंनाच्या वेळी एक चमकाचा अनुवाक्‌ म्हणणे. त्याला रुद्रएकादशनी असे म्हणतात. अशा वरीलप्रमाणे अकरा एकादशनी करणे यालाच लघुरुद्र असे म्हणतात. असे अकरा लघुरुद्र करणे याला एक महारुद्र असे म्हणतात. अशा अकरा महारुद्राचा एक अतिरुद्र होतो.
गणपतीला अथर्वशीर्षाची २१ आवर्तने म्हणावीत. फलश्रुती शेवटी एकदा म्हणावी. तसेच गणपतीपीत्यर्थ ब्रह्मणस्पतिसूक्त २१ वेळा म्हणावे. श्रीसूक्त-देवीचा अभिषेक करताना श्रीसुक्त १६ वेळा म्हणावे. पवमान-पवमानाचे एकदा आवर्तन करावे. पुरुषसूक्त -पुरुषसूक्त १६ वेळा म्हणावे. महिम्नस्तोत्र-महिम्नस्तोत्र ११ वेळा म्हणावे.
अभिषेकपात्र- वनगाईच्या शिंगातून शिवाला अभिषेक करवा. शंखाने विष्णूला अभिषेक करावा. सूर्य व गणपती यांना ताम्रपात्रांतून अभिषेक करावा. स्वर्णपात्रातून देवीला अभिषेक करावा. सर्व देवांना तांब्याच्या पात्रातून अभिषेक केलेला चालतो.