अधिकार व कर्तव्य

एक अंधळा व एक लंगडा – दोघांनाही एकाच गावी जायचे आहे. ते दोघे जर परस्पर सहकार्याने काम करतील – म्हणजे अंधळा लंगड्याला उचलून घेईल व लंगडा अंधळ्याला वाट दाखवील, तर काम सुलभ होईल. घराच्या भल्याकरिताही कर्तव्याची जाण व अधिकाराचे भान दोन्ही आवश्यक आहेत. स्वतःचे कर्तव्य बजावत असता तसाच व्यवहार इतरांकडून अपेक्षिण्याचा अधिकार त्या व्यक्तीला असतीच. तसे होत नसेल तर तशी जाणीव येणे हेही एक कर्तव्यच बनते. घरातील मोठी माणसे या सर्व गोष्टी कुशलतेने करवून घेऊन शकतात.

आई मुलाला सांगते, “ बाळा, तू दूध घ्यायला स्वयंपाकघरात ये व येताना आजीची चहाचि रिकामी कपबशी घेऊन ये. ” हे एक छोटेसे वाक्य. पण ते कोणकोणते संस्कार करते ? मी तुझ्यापेक्षा मोठी असल्याने माझे कष्ट कमी करण्यासाठी तू आत ये. ( ते तुझे कर्तव्य आहे ) रिकामी कपबशी ( मी आजीला चहा आधीच दिलेला आहे – माझे कर्तव्य ) आण. ( आजीची सेवा – तुझे कर्तव्य ) तू ते पार पाडावेस ही अपेक्षा करणे ( माझा अधिकार ). नातवाला आजीकडून मिळणारी शाबासकी व ‘ सांभाळून ने ’ ही सूचना पण कर्तव्य आधी, अधिकार नंतर हाच कर्म असतो. अधिकार हा शब्द जरा गैरसमज निर्माण करतो. ‘ रास्त अपेक्षा ’ म्हणता येईल -अहं ! तीही तुम्हाला करता येणार नाही. कर्मण्येताऽधिकारस्ते ! …

श्रीकृष्णांनी तर कर्तव्य व अधिकार यांतील दुरावा पूर्ण नाहीसाच करून टाकला आहे. ते म्हणतात, कर्म म्हणजे कर्तव्य करणे हाच अधिकार आहे. कर्तव्याचा अधिकार ही घराने व्यक्तीला दिलेली व घराला व्यक्तीकडून मिळालेली देणगीच आहे.

अधिकाराचा विकास
व्यक्तीला हा कर्तव्याचा अधिकार प्राप्त झाला की, जणू काही तो अखिल विश्वाचा सम्राटच बनतो, असे म्हणायला हरकत नाही. के नवीन खेळणे हातांत आले की, व्यक्ती त्याचा उपयोग आधी स्वतासाठी, स्वतावर प्रयोग करते. माझे स्वसंबंधी कर्तव्य-उत्तम देहसंपदा, ड्यानोपासना,सद्गुणांचा विकास अन या सगळ्या गोष्टींचा सत्कार्यासाठी उपतोग करण्याची बुद्धी- या सर्व गोष्टी प्राप्त करणे हे झाले स्वसंबधी कर्तव्य.

यातूनच निर्माण होतो कुटुंबासंबंधी कर्तव्यभाव. कुटुंबीयांचा विकास व्हावा, त्यांची सुरक्षीतता, शिक्षण, स्वास्थ, मानसिक स्थैर्य व आवश्यक गोष्टींची पूर्तता यासाठी हा ‘ स्व‘ प्रयत्नशील राहतो. पण तेवढ्यापुरतीच त्याच्या कर्तव्याची मर्यादा असत नाही. शेजारीपाजारी- गाव- तालुका- म्हणजे समाज- राष्ट्र- पक्षी, प्राणी, कीटक, वनस्पती आदी सजीव स्रुष्टी- परमेष्टी असे हे वर्तुळ वुस्तारत जाते.

वर्तुळविकासाची सहजता
कर्तव्यविचार अधिकाधिक विकसित अगदी सहजपणे होत जातो. माझ्या कुटुंबीयांबद्दलची भावना हळूहळू विस्र्तुत होत जाते व शेजारीपजारीसुध्दा सुखी व्हावेत, असे वाटू लागते. शेजारच्या काका-काकुबद्दल आपुलकी वाटायला लागते. त्यांव्या आनंदात सहभागी होणे त्यांच्या अड्चणीच्या वेळी मदत करणे हा स्वभाव बनतो.शेजारची मुलगी माझी ताई,मावशी आत्या बनते. मग तिची कुचेष्टा करायला मन धजत नाही. कोणी कुचेष्टा करु लागले तरी राग येतो. आपल्या लक्षात येइल की, हा भाव कमी झाल्यामुळे आजकाल ‘स्त्री‘ वर वासनेला बळी पड्ण्याचे प्रसंग उदभवतात. साधारणपणे ज्या घरात ओळखीच्या मुला-मुलीना दादा, ताई, ती मुली- मुले अशा अनैतिक गोष्टीना बळी पडत नाहीत.

सजीव सुष्टी
हाच ममत्वाचा भाव पशुपक्षी, कीटक, वनस्पती यांबाबतही उत्पन्न होतो. त्यांचे रक्षण, त्यांच्याबद्दल ममत्वभाव या गोष्टी सहजरीत्या घडत राहतात. पूर्वी घराच्या उंच भिंतींना पक्षांच्या निवासासाठी विटांमद्ये पोकळ जागा आवर्जून ठेवली जायची. आजही मोठमोठ्या शहरांतून कबुतरे व पक्षी यांना धान्य घालण्यासाठी ठेवली जायची. आजही मोठमोठया शहरांतुन