अधिकमासाचे महत्त्व

अधिकमासाचे महत्व

अधिकमासाचे महत्व

याला मलमास, पुरुषोत्तम मास आणि महाराष्ट्रात धोंडामास असेही म्हणतात. चांद्र वर्ष व सौर वर्ष यांचा मेळ घालण्यासाठी सरासरी वर्गास किंवा तेहतीस चांद्रमासानंतर चांद्र वर्षात जी एक अधिक महिना धरावा लागतो. त्याला अधिकमास म्हणतात. सामान्यतः प्रत्येक चांद्र मासात एक सौर संक्रांती होत असते. ज्या मासात अशी एकही सौर संक्रांती घडत नाही, म्हणजेच जो चांद्रास संपूर्णपणे दोन संक्रांतीच्या दरम्यान येतो, तो अधिकमास समजायचा. ज्या सूर्याची मेषसंक्रांती चैत्र अमावस्येला घडली व त्याची वृषभ संक्रांती वैशाखात न होताती त्यापुढील महिन्याच्या प्रतिपदेस घडली, तर हा संक्रांतीविहीन मास अधिक वैशाख ठरेल व त्यापुढचा महिना तर निज वैशाख होईल.

चैत्र, ज्येष्ठ व श्रावण हे १२ वर्षांनी, आषाढ १८ वर्षांनी, भाद्रपद २४ वर्षांनी, आश्विन १४१ वर्षांनी व कार्तिक ७०० वर्षांनी अधिक मास होतो. भाद्रपदापर्यंतच्या मासांना अधिक मास म्हणतात. आश्विन व कार्तिक अधिक झाले, तरी त्यास तसे म्हणत नाहीत. ज्या वर्षी आश्विन अधिकहोतो, त्या वर्षी पौष क्षयमास होतो. अशावेळी दोन प्रहारापर्यंत मार्गशीर्ष व दोन प्रहरानंतर पौष मानून दोन्ही मासांची धर्मकृत्ये एकाच महिन्यात कर्तात. या जोड मासाला संसर्प असे म्हणतात. कार्तिकपुढील चार महिने अधिकमास होत नाहीत व आश्विनाच्या पूर्वी होत नाही.

बृहत्रारदीय व पद्म या पुराणात पुरुषोत्तममासमाहात्म्य व मलमासमाहात्म्य या प्रकरणात अधिक मासाचे महत्व वर्णिले आहे. त्यात अधिक मासात करायची व्रते, दाने, उद्यापने यांचा विधी सांगितला असून, फलश्रुतीही निवेदिली आहे.

अधिकमासकृत्ये – या मासाची देऊन पुरुषोत्तम म्हणजे विष्णू ही मानली असून, त्याच्या कृपेसाठी पुढील कृत्य करण्यास सांगितले आहे.

पूजा, पापक्षालनासाठी मलमासव्रत, प्रत्येक दिवशी अनरसे इ. पक्वान्ने तेहतीस या संख्येने कांस्यपात्रात भरून पात्रासह त्यांचे दान, पादत्राणे व छत्री यांचे दान, सुवर्णदक्षिणा इत्यादी.

महाराष्ट्रात अधिकमासातले अनरशांचे वाण बहुधा जावयाला देतात. कन्या व जामात यांना लक्ष्मीनारायणस्वरूपी मानले आहे. त्यातून ही पद्धत आली असावी.
जी कर्मे अन्य वेळी करणे शक्य असेल, ती अधिकमासात वर्ज्य सांगितली आहेत उदा. अध्याधान, देवप्रतिष्ठा, राज्याभिषेक, विवाहोपनयनादी संस्कार, गृहारंभ, गृहाप्रवेश, देशांतर यात्रा इ.

अधिकमासात मृत झालेल्यांचे श्राद्ध व महालय, शुद्ध मासात त्या तिथीस करतात. अधिकमासात जन्मलेल्या बालकाचा जन्मास त्या नावाचा शुद्ध मास असेल तो धरतात.