अखिल मंडई मंडळ शारदा गणेश

अखिल मंडई मंडळ शारदा गणेश

अखिल मंडई मंडळ शारदा गणेश

अखिल मंडई मंडळाला यंदा ११८ वर्षे पुर्ण झाली आहेत.शारदा गणेश विराजमान असलेली मुर्ती हे या मंडळाचे वैशिष्टय आहे.
या गणपतीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ही मुर्ती ईको फ्रेन्डली आहे. मंडईतल्या एका व्यापाऱ्याला अनेक दिवस मुलबाळ नव्हते. त्याने तूळजापुरच्या तूळजाभवानीला नवस केला आणि नवस पुर्ण झाल्यास शारदा गजाननाची मुर्ती बसवण्याचे ठरविले त्या व्यापाऱ्याची ईच्छा पुर्ण झाली आणि त्याने ही मुर्ती मंडळाला दिली.

तेव्हापासून आजतागायत ही परंपरा अखंडपणे चालू आहे. तीन वर्षांतून एकदा ही मुर्ती झोपाळ्यावर विराजमान होते.
गजानानची सोंड उजवी असून इच्छापुर्ती गणेश म्हणून या गणपतीचा लौकीक हे.

१९५३ साली मंडईतल्या व्यापाऱ्यांनी गजानान शारदेची प्रतिकृती मंडळाला भेट दिली ही मुर्ती मंडपात बसवण्यात येते. दरवर्षी गजानान शारदेची मुर्ती वेगवेगळ्या पध्दतीने सजवण्यात येते.
इथली साजवट आणि आरास नयनरम्य असते. यंदा तर अखिल मंडई मंडळाने जेजुरीचा मल्हार गडाचा देखावा साकरला आहे. पुणेकरांसाठी हा देखावा आकर्षणाचा केद्रंबिंदू ठरला आहे.

अखिल मंडई मंडळ शारदा गणेश पुणे फोटो