Category Archives: मराठी गझल

मराठी गझल | Marathi Ghazal

रेशमीचे बंध

रेशमीचे बंध, मी छाटून आले
वेदनेची लाट, मी आटून आले

भोगले जे दु:ख, त्याला सोबतीने
वंचनेची साथ, मी थाटून आले

रात सोसूनी, फुलांच्या चिंब नेत्री
त्या दवाचे थेंब, मी चाटून आले

संपली रात्र, सखा आला तरूनी
कापराचे प्रेम, मी वाटून आले

ही तुझी, साधी कहानी ठीक आहे
माझीया डोळ्यात, मी दाटून आले