खिलाडी ७८६ च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार पुण्यात

अक्षय कुमार

अक्षय कुमार

खिलाडी ७८६ च्या प्रमोशनसाठी खिलाडीची संपूर्ण टिम पुण्यात दाखल झाली होती. खिलाडीच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि गायक आणि संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमीया प्रथमच निर्माते म्हणून एकत्र आले आहे. फेम सिनेमा हडपसर इथं आयोजित पत्रकार परिषदेत अक्षय ने पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. रावठी राठोड च्या यशामूळे पुन्हा अ‍ॅक्शन पटांकडे वळाल्याचं अक्षय नी यावेळी सांगितले. तसेच यानंतरही अ‍ॅक्शन पटांवर लक्ष केंद्रीत करणार आहे तसेच शक्य झाल्यास एखादी प्रेमकथा ही करण्यास उत्सुक असल्याचं ही त्याने सांगितले. स्काय ब्लू पठाणी कूडता आणि गळ्यात स्कार्फ गुंडाळलेल्या अक्षय कुमारचा कूल लूक सर्वांच्याच नजरेत भरणारा होता.

अक्षय कुमार, परेश रावल, असीन, मिथून चक्रवर्ती, राज बब्बर अशी बडी स्टार कास्ट असलेला खिलाडी ७८६ बॉक्स ऑफिस वर कमाल दाखवेल का हे लवकरच कळेल. अ‍ॅक्शन, प्रेम, विनोद याचं मिश्रण असलेला खिलाडी ७८६ ही एक मसाला मुव्ही आहे. एरॉस इंटरनॅशनल, हरि ऑम प्रोडक्शन आणि एच.आर म्यूझिक निर्मीत खिलाडी ७८६ हा ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.