आलू-भुजिया (उपवासाचा चिवडा)

साहित्य:

  • बटाटे
  • तळण्याकरिता एक किलो तेल
  • शेंगदाणे पाव किलो
  • मीठ चवीपुरते
  • मिरच्या ८-१०
  • कडीपत्ता
  • काजू तुकडा- अर्धा वाटी

कृती:

बटाटे अर्ध-कच्चे वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर साल काढून किसून द्यावेत. हा कीस दोन- तीन दिवस उन्हात वाळवून घ्यावा. अगदी कडकडीत सुकल्यावर हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवावा. कढईत तेल चांगलं तापू द्यावं. चिवडा तळण्याच्या मोठया चाळणीत मूठ-मूठभर बटाट्याचा कीस घालून तळून घ्यावा. तो नंतर पेपर नॅपकिनवर टाकावा. नंतर शेंगदाणे चाळणीत घेऊन ते खरपूस तळून घ्यावे. नंतर कडीपत्ता तळून घ्यावा. काजू तळून घ्यावे. शेवटी मिरच्यांचे बारीक तुकडे तळून घ्यावे. हे सर्व मिश्रण एका मोठय़ा भांडय़ात घ्यावे. त्यात चवीपुरते मीठ घालावे व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे. आलू-भुजिया खाण्यासाठी तयार आहे.