अळूची भाजी

साहित्य :

 • अळूची ८-१० पाने
 • अर्धा डाव चणा डाळ
 • १५-२० शेंगदाणे
 • ८-१० काजूचे तुकडे
 • ४-५ मिरच्या
 • ८-१० पाने कढीलिंब
 • अर्ध्या लिंबाएवढी चिंच
 • लिंबाएवढा गूळ
 • अर्धा चमचा थोडा मसाला
 • ८-१० मेथ्याचे दाणे
 • मीठ
 • १ डाव डाळीचे पीठ
 • २ पळ्या तेल
 • फोडणीचे साहित्य

कृती :

अळूची भाजी

अळूची भाजी

अळूची पाने व देठे चिरून चांगली धुवून घ्यावीत. १ पळीभर तेलात मिरच्याचे तुकडे व मेथ्याचे दाणे घालून अळूची भाजी टाकून चांगली मऊ होईपर्यंत परतावी.

नंतर त्यात भिजलेली चणा डाळ, शेंगदाणे घालावेत. सर्व वाफवून घ्यावे. चिंच, गूळ, मसाला, मीठ, डाळीचे पीठ पाण्यात कालवून भाजीबरोबर एकत्र करावे.

भाजी उकळली की तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीलिंब घालून फोडणी करावी वर ती भाजीवर ओतावी.