अंबाघाट

अंबाघाट

अंबाघाट

कोल्हापूर-रत्नागिरी हमरस्त्यावरून ६२ कि.मी. अंतरावर मलकापूरच्या पुढे गेल्यावर अंबाघाट सुरु होतो. अत्यंत निसर्गरम्य, हिरव्यागर्द झाडांनी आणि अनेक रानफुलांनी भरलेल्या ह्या परिसरात घाटाच्या वर अंबा गांव आहे. विशाळगड, पावनखिंड अशा ठिकाणांना येथून जाता येते, इथे राहण्यासाठी काही खाजगी बंगल्यांची सोय होते. घाटातून खाली गेल्यावर साखरपा हे कोकणातील निसर्गरम्य गांव आहे. येथुन देवरुख, मार्लेश्वर, विशाळगड, पावनखिंड अशा ठिकाणांना जाता येते. येथे जाण्यासाठी सप्टेंबर ते मार्च हा काळ आल्हाददायक आहे.