आंब्याची बर्फी

साहित्य :

  • ३ हापूसचे आंबे
  • १ नारळ
  • १ वाटी दूध
  • अर्धी वाटी मिल्क पावडर
  • साखर व थोडी पिठीसाखर.

कृती :

आंब्यांचा रस काढा. नारळ खरवडून घ्या. आंब्याचा रस, ओले खोबरे, मिल्क पावडर व दुध एकत्र करा व मिक्सरमधून काढा.हे मिश्रण एका पातेलीने मोजा. जितके मिश्रण भरेल तितकीच साखर घ्या. नंतर सर्व एकत्र करून गॅसवर ठेवा. घट्टसर झाले की उतरवून जरा घोटा. नंतर त्यात पिठीसाखर घालून घोटा व तूप लावलेल्या थाळीत थापा. लगेचच वड्या पाडा व जरा वेळाने काढा.