आम्रखंड

साहित्य :

  • ५०० ग्रॅम मलईचा चक्का
  • ५०० ग्रॅम साखर
  • २ हापूसच्या आंब्याचा रस (टीनमधलाही चालेल)
  • शोभेसाठी थोडे काजूचे काप.

कृती :

चक्का व साखर एकत्र करून पुरण-यंत्रातून काढा. नंतर त्यात आंब्याचा रस घाला. मिश्रण नीट ढवळा. आंबा घातल्यावर दुसरा कुथलाही वास किंवा रंग घालण्याची जरुरी नाही. वरून काजूचे कप लावून सजवा. आंब्याचे दिवस नसताना करायचे असल्यास टीनमधील आंब्याचा रस वापरून करा.