आरोग्य संवर्धन

आरोग्य हा एक असा वसा आहे. घेतला वसा टाकू नका !

वैयक्तिक तसेच कौटुंबिक आनंद व विकासाकरता आरोग्य संपादन व संरक्षण हे महत्त्वाचे साधन आहे. शारीरिक तसेच मानसिक स्वाथ्याशिवाय आपण सुखाचा उपभोग व स्वाद घेऊ शकत नाही. कामधंदा नीट होत नाही. मन लागत नाही आणि मग विकासाचा प्रश्नच उद्भवत नाही. आपले आरोग्याकडे लक्ष जाते ते केवळ आजारीपणातच. ही खेदाची गोष्ट आहे. ‘रोग टळो आणि वैद्य पळो’ अशी म्हणच पडली आहे. केवळ डॉक्टरांवर अवलंबून राहून राहून आरोग्य संपादन होणार नाही हे जरी सत्य असले तरी असे दुर्लक्ष करून आणि उपेक्षा दाखवून आरोग्याची निगा राखता येणार नाही. आरोग्याचे लेणे स्वकष्टाजींत असते. ते स्वतःचे जिम्मेदारीवरच मिळवावे लागते. अनेकांच्या सुदैव आईवडीलांनी त्यांना आरोग्याचा वंशपरंपरागत आलेला ठेवा दिलेला असतो. पन त्याचेवर सर्वस्वी विसंबून राहणे, किंवा हा किल्ला अभेद्य किंवा अभय आहे असे समजणे, म्हणजे एक फसवणूक ठरेल.

आरोग्याची कल्पना
भारतीय संस्कृतीनुसार स्वस्थ्याची किंवा आरोग्याची कल्पना शारीरिक व मानसिक अवस्था एवढ्यापुरतीच संकुचित नसून त्याचे वर सामाजिक आणि वैचारिक  (Spiritual)  सुदृढता ह्यांचा मुलामा देऊन सुंदरपणे विकसीत केलेली एक प्रकारची संपन्नता आहे. आपल्या अनेक परंपरा व रूढीचे उगम आरोग्याच्या वरील कल्पनेवर आधारीत आहेत. त्यांचा अनादर करून चालणार नाही. कालानुसार त्यात योग्य फरक करणे हे मात्र शास्त्रीयदृष्ट्या योग्यच आहे. आरोग्याचे मूळ आपले पोषण करणारे अन्न, हवा, पाणी, घरदार, प्राणी, वनश्री इत्यादी असणारा सर्व परिसर, आणि मूख्य म्हणजे आपली दिनचर्या, राहणी, कामधंदा, संवयी, व्यायाम, जीवनाकडे बघण्याची दृष्टी वगैरे अनेक गोष्टींत सामावलेले असते, किंबहुना जीवन व आरोग्य ह्यांची फारकत करता येणार नाही. ते दोन्ही परस्परांवर अवलंबून असतात.

आरोग्य आणि टॉनिक्स
पुणे शहरातील तालीम व आखाडे प्रसिद्ध आहेत. तेथे अनेक तरुण आजसुद्धा तालीम करून शरीर कमावतात. त्याचप्रमाणे आरोग्य कमावण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. डॉक्टरांचे औषध रोगा करतात असते. तसेच “ टॉनिक” व इतर मोठ्या प्रचारयंत्रणेद्वारा फैलावत असलेली आधुनिक प्रक्रिया क्लेली ‘पौष्टिक अन्ने” ही सामाजिक फसवणूक आहे. ह्यात पैसा तर अकारण जातोच पण आरोग्य मात्र पदरात पडत नाही. अर्थात लहान मोठ्या “औषधी ” कंपन्या व व्यवसाय मात्र सर्व बाजूंनी सुदृढ व गबर होतात किंबहुना नेहमी औषधे घेऊन, विनाकारण जीवनसत्त्वे व “टॉनिक” च्या बाटल्या स्वस्त करून, आरोग्य संपादनपेक्षा रोग निर्माण होण्याचाच संभव जास्त, तेव्हा शास्त्रीयशुद्ध ज्ञान प्राप्त करा आणि गैरसमजुती, अफवा जाहिरातबाजी, इत्यादी आमिषे टाळा.

आता हा आरोग्याचा वसा कसा आहे, काय आहे? सोपा आहे, मात्र सोडता कामा नये. काही गोष्टी अगदी नियमित करावयाची सवय पडली पाहिजे आणि काही पथ्ये, काही गोष्टी कटाक्षाने टाळावयाच्या. अगदी तांदुळातल्या खड्याप्रमाणे शतायुषी व्यक्तींना आपण त्यांचे दीर्घायुषी होण्याचे रहस्य विचारतो. ह्यात काही रहस्य नसते. आपला जन्म झाला तो कृती करण्यासाठीच. आयुष्य उपभोगावयाचे व आपल्या कृतीतून कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी उत्तमरीतीने पार पाडणे ह्या अद्वैत जीवनानंद घेतला पाहिजे. असे हे आरोग्यदायक जीवन कोणते ह्याचे एक सोपे कोष्टक , “पाळा आणि टाळा !” ह्या लेखात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा उपक्रम आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल .

(अ) सर्वसाधारण

(१) मित्र

पाळा व जोडा :- नियमितपणा, सर्वबाबतीत
शत्रू
टाळा व फोडा :-  अनियमितपणा
(२)
मित्र
पाळा व जोडा :- वैयक्तिक स्वच्छता
शत्रू
टाळा व फोडा :- मलीनता, घाणेरडेपणा
(३)
मित्र
पाळा व जोडा :-  व्यायाम
शत्रू
टाळा व फोडा :- आराम, आळस
(४)
मित्र
पाळा व जोडा :- सकस पण मोजका आहार
शत्रू
टाळा व फोडा :- एकाच प्रकारचे अन्न, अर्जीण
(५)
मित्र
पाळा व जोडा :- प्रसन्नता, सुविचार, पूजा-अर्चा
शत्रू
टाळा व फोडा :- वाईट विचार, दुराचार
(६)
मित्र
पाळा व जोडा :- मित्रमैत्रिणी खेळाडूपणा इतरांना मदर
शत्रू
टाळा व फोडा :- एकलकोंडेपणा, स्वार्थ, व्यसने, अतिरेक-कोणताही
(७)
मित्र
पाळा व जोडा :- आरोग्यदाय व स्वच्छ परिसर ह्यात पाणी मुत्र-मैल्याची योग्य विल्हेवाट, जमीन, पाणी व हवा ह्यांचे प्रदूषण, वगैरे सार्वजनिक व औधोगिक आरोग्यातील बाबींचा समावेश आहे.
शत्रू
टाळा व फोडा :- उकिरंडा, मैला, सांडपाणी यांचे निकालबाबत बेपर्वाई, आळस, घरातली घाण बाहेर इतरत्र टाकणे, थुंकणे इत्यादी
(८)
मित्र
पाळा व जोडा :- सार्वजनिक आरोग्याबद्दल आदर व त्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या
शत्रू
टाळा व फोडा :- सार्वजनिक आरोग्यबद्दल बेजबाबदारी आणि अनास्था

(ब) कौटुंबिक
(१)
मित्र
पाळा व जोडा :- एकत्र कुटुंब पद्धती
शत्रू
टाळा व फोडा :-“दोघांचे” राज्य
(२)
मित्र
पाळा व जोडा :- मोठ्यांचा आदर व मान
शत्रू
टाळा व फोडा :- इतरांचा अनादर
(३)
मित्र
पाळा व जोडा :- आहे त्यात समाधान व गोडवा
शत्रू
टाळा व फोडा :-  असमाधानी वृत्ती, दुसऱ्याशी तुलना
(४)
मित्र
पाळा व जोडा :- वैवाहिक पवित्रता, चरित्र, देवाण-घेवाण वृत्ती आणि समझोता
शत्रू
टाळा व फोडा :- इतरांचे दोष किंवा उणिवांना अवास्तव महत्त्व, कोतेपणा
(५)
मित्र
पाळा व जोडा :- सर्व शंकाचे निवारण आणि मिळते घेण्याची वृत्ती
शत्रू
टाळा व फोडा :- मनात अढी ठेवणे आणि जुन्या गोष्टी उगळत बसणे
(६)
मित्र
पाळा व जोडा :- इतरांचे ऐकून घेणे, मुलांची वैशिष्ट्य जाणणे व त्यांचे कौतुक करणे.
शत्रू
टाळा व फोडा :- एकलकोंडेपणा, हट्टी वृत्ती
(७)
मित्र
पाळा व जोडा :- गप्पा आणि खेळीमेळीचे वातावरण
शत्रू
टाळा व फोडा :- भांडणे, शिवीगाळ
(८)
मित्र
पाळा व जोडा :- २० ते २५ वर्षे पर्यंत विवाह आणि लैंगिक शिक्षण
शत्रू
टाळा व फोडा :- १८ वर्षे खालील किंवा ३५ वर्षेनंतरचे विवाह
(९)
मित्र
पाळा व जोडा :- एक किंवा दोन अपत्ये, आणि बालसंगोपण सल्ला.
शत्रू
टाळा व फोडा :- “अष्टपुत्रा सौभाग्यवती”
(१)
मित्र
पाळा व जोडा :- मुलांवर माया, त्यांचे संवर्धन, शिक्षण, चालिरीती, रोगापासून संरक्षण व इतर संस्कार
शत्रू
टाळा व फोडा :- मुलांकडे दुर्लक्ष, हेळसांड, मारपीट, आणि चुकीचा आदर्श पुढे ठेवणे

(क) संसार
(१)
मित्र
पाळा व जोडा :- योग्य वेळी पहिला पाळणा
शत्रू
टाळा व फोडा :- फार लवकर किंवा उशिरा पहिला पाळणा
(२)
मित्र
पाळा व जोडा :- दिवस गेल्याचा आनंद व नैसर्गिकता.
शत्रू
टाळा व फोडा :- दिवस गेल्यावर अति काळजी किंवा बेफिकीरपणा
(३)
मित्र
पाळा व जोडा :- प्रसूतिपूर्व चिकित्सा आणी मार्गदर्शन, काटेकोर पालन
शत्रू
टाळा व फोडा :- गरोदरपणाबाबत हलगर्जीपणा, तज्ज्ञांकडे न जाता अशिक्षित आणि अजाणकाऱ्यांकडे जाणे, योग्य काळजी न घेणे, सल्ला न मागणे.
(४)
मित्र
पाळा व जोडा :- प्रसूतिकरता योग्य व्यवस्था आणि उत्तम शुश्रुषा.
शत्रू
टाळा व फोडा :- रोगप्रतिबंधक लसी न घेणे किंवा दुसरी मात्रा विसरणे.
(५)
मित्र
पाळा व जोडा :- प्रसूतिनंतरची देखभाल,
शत्रू
टाळा व फोडा :- चालढकल करणे, घरगुती उपाय करणे, मैत्रिणीचा अतीध्योखीपूर्ण सल्ला तज्ज्ञांपेक्षा योग्य मानणे.
(६)
मित्र
पाळा व जोडा :- आरोग्यशिक्षण, विशेषतः पोषण, रोगप्रतिबंध व बालसंगोपनाविषयक.
शत्रू
टाळा व फोडा :- जादूटोणा व इतर वेडेवाकडे उपाय, वैदूकडून गर्भपात, वेळ घालवणे, गर्भपाताला धोका आणि तोटे.
(७)
मित्र
पाळा व जोडा :- वंध्यत्व चिकित्सा आणि त्यावर शास्त्रीय उपाययोजना
शत्रू
टाळा व फोडा :- दरवर्षी गणेशोत्सवाप्रमाणे पाळणा हलवणे.
(८)
मित्र
पाळा व जोडा :- पाळी चुकली पण मूल नको असेल तर १५ दिवसांचे आत डॉक्टरांचेकडे जाऊन पाळी चालू करणे.
शत्रू
टाळा व फोडा :- योग्य वेळी नसबंदी न करणे.
(९)
मित्र
पाळा व जोडा :- संततिनियमन, दोन मुलात ३ ते ४ वर्षे अंतर
शत्रू
टाळा व फोडा :- मुलांचेकडे लक्ष न देणे आणि सुप्रजा निर्माण करण्याच्या राष्ट्रीय कर्तव्यावर भर न देणे.
(१०)
मित्र
पाळा व जोडा :- पाळणा थांबवणे.
शत्रू
टाळा व फोडा :-
(११)
मित्र
पाळा व जोडा :- सुप्रजाजनन, सुदृढ, खंबीर, आणि सुसंस्कृत संतती
शत्रू
टाळा व फोडा :-

(ड) स्वयंपाक
(१)
मित्र
पाळा व जोडा :- पाणी प्रथम गरम करून शिजवण्याचे पदार्थ नंतर टाकणे.
शत्रू
टाळा व फोडा :- थंड पाण्यात भाज्या इ. पदार्थ घालून नंतर उकडणे
(२)
मित्र
पाळा व जोडा :- शिजण्यास पुरेल तेवढेच पाणी वापरणे
शत्रू
टाळा व फोडा :- फाजील पाणी वापरून भाज्या व इतर अन्न पातळ बनवणे.
(३)
मित्र
पाळा व जोडा :- पालेभाज्या व इतर नवलकोल, मुळा ह्यांची पाने आणि कांद्याची पात ह्यांचा वापर.
शत्रू
टाळा व फोडा :- भाजीची खाण्यास योग्य अशी पाने केवळ स्वस्त किंवा नावडती म्हणून टाकून देणे.
(४)
मित्र
पाळा व जोडा :- अन्न फार शिजवणे टाळून साधारणतः १५ मिनिटे उकळणे.
शत्रू
टाळा व फोडा :- भात, वरण भाज्या इत्यादीतले जास्त पाणी ओतून टाकणे.
(५)
मित्र
पाळा व जोडा :- अन्न ताजे व गरम वाढणे.
शत्रू
टाळा व फोडा :- अन्न परत परत गरम करणे.
(६)
मित्र
पाळा व जोडा :- अन्नपदार्थात विविधता, सर्व धान्य, डाळी कडधान्ये भाज्या इत्यादींचा आलपालटून वापर.
शत्रू
टाळा व फोडा :- एकाच प्रकारचे धान्य डाळ वगैरेचा सातत्याने वापर, फक्त बटाटे, कोबी वगैरे भाज्या खाणे.
(७)
मित्र
पाळा व जोडा :- अन्न ठेवण्यास शीतपेटीचा, किंवा थंड जागी जाळीच्या बंद कपाटाचा वापर.
शत्रू
टाळा व फोडा :- अन्न, फळे, भाज्या वगैरे उघड्यांवर, गरम जागी ठेवणे आणि त्यावर माश्या व धूळ बसू देणे.
(८)
मित्र
पाळा व जोडा :- अन्न पदार्थ खरेदी करताना केवळ स्वस्तपणा न पाहता गुणांची पारख करणे
शत्रू
टाळा व फोडा :- अवास्तव स्वस्त पदार्थात भेसळ असते हे न मानून खरेदी करणे, खाण्याचा सोडा वापरणे.
(९)
मित्र
पाळा व जोडा :- स्वयंपाकघर व भांड्याची स्वच्छता, स्वयंपाक करण्याचे किंवा पदार्थ हातालणे, वाढणे ह्या कामापूर्वी हात स्वच्छ धुणे.
शत्रू
टाळा व फोडा :- अस्वच्छता, अन्न दूषित होईल अशी परिस्थितीत सोवळ्याचे कल्पनेचा अनादर, पाण्याचा अपूरा वापर.
(१०)
मित्र
पाळा व जोडा :- अन्न हे ईश्वर आहे.
शत्रू
टाळा व फोडा :- अन्नाचा अनादर करणे आणि ते नावडते म्हणने वाया घालवणे.

(ग) रोगप्रतिबंधक
(१)
मित्र
पाळा व जोडा :- घराच्या समोरा-समोराच्या खिडक्या मोकळ्या ठेवून घरात खेळती हवा ठेवणे.
शत्रू
टाळा व फोडा :- बंदीस्त घरात राहणे, दरवाजे खिडक्या बंद करणे, ऊन घरात येण्यास वाव न देणे.
(२)
मित्र
पाळा व जोडा :- शक्यतोवर तांब्याचे पात्रात आणि तेशक्य नसेल तर कोणत्या स्वच्छ पात्रात पिण्याचे व स्वयंपाकाचे पाणी साठवणे, २-३ दिवस ठेवलेले पाणी न वापरणे, पाणी नळाद्वारे किंवा खास पाणी पात्रातून बाहेर काढणे.
शत्रू
टाळा व फोडा :- पाणी अस्वच्छ पात्रात साठवणे, नळ चालू झाल्यावर लगेच पाणी घेणे, घाईने पाण्यात हात किंवा प्रत्येक भांडी, बुचकळणे, पाणी कोणत्याही प्रकारे दुषित करणे, वाया घालवणे.
(३)
मित्र
पाळा व जोडा :- रोज कचरा काढणे, पेटीत साठवणे, रोज सार्वजनिक पेटीच्या आत टाकणे, कचरा बंद पेटीत ठेवणे.
शत्रू
टाळा व फोडा :- कचरा साठू देणे, केर नेहमी न काढणे, शेजारचे घरात ढकलणे, किंवा कचरा पेटीचे बाहेर टाकणे.
(४)
मित्र
पाळा व जोडा :- संडासाचा वापर, तो साफ व कोरडा ठेवणे, नंतर प्रत्येक वेळी साबणाने व भरपूर पाण्याने स्वच्छ करणे.
शत्रू
टाळा व फोडा :- मुलांना कागदावर किंवा रस्त्यावर बसवणे, संडास गलिच्छ ठेवणे, हात काळजीपूर्वक साफ न करणे.
(५)
मित्र
पाळा व जोडा :- सभोवताली, रस्ते आणि सार्वजनिक बागा व इतर जागी स्वच्छता राखणे.
शत्रू
टाळा व फोडा :- रस्त्यावर, सार्वजनिक बागा व इतर मोकळ्या जागी घाण करणे.
(६)
मित्र
पाळा व जोडा :- माशा, डास व इतर किटकांपासून संरक्षण करण्याचे व त्यांचा नाश करण्याचे उपाय समजाऊन घेणे व त्यांचा सातत्याने वापर करणे.
शत्रू
टाळा व फोडा :- माश, झुरळे, डास, यांना मित्र मानून अगत्याने निमंत्रण देणे.
(७)
मित्र
पाळा व जोडा :- सकस आणि माफक आहार जेवणात विविधता आणि नियमितपणा
शत्रू
टाळा व फोडा :- फार आवडीनिवडी, एकाच प्रकारचे जेवण, दुषित व शिळे अन्न.
(८)
मित्र
पाळा व जोडा :- योग्य वजन कायम राखणे,
शत्रू
टाळा व फोडा :- लठ्ठपणा, वजनात फार बदल
(९)
मित्र
पाळा व जोडा :- निर्जंतूक केलेले पाणी.
शत्रू
टाळा व फोडा :- दूषित पाणी.
(१०)
मित्र
पाळा व जोडा :- मच्छर दाणीचा रोज वापर
शत्रू
टाळा व फोडा :- इतःस्ततः थुंकणे
(११)
मित्र
पाळा व जोडा :- नियमित आणि माफक व्यायाम
शत्रू
टाळा व फोडा :- आळस, आराम, जास्त दमणे.
(१२)
मित्र
पाळा व जोडा :- शांत झोप, विश्रांती (कामानंतर) चांगले छंद, खेळ, सहली, मैत्रिणी,
शत्रू
टाळा व फोडा :- जागणे, घरबसलेपणा, व्यसने, निरद्योगीपणा, कामाचा अतिरेक
(१३)
मित्र
पाळा व जोडा :- शांतपणा, अतिकाळजी, मुक्तता, स्वातंत्र्य
शत्रू
टाळा व फोडा :- तापटपणा, बेफिकीरपणा, अतिदाय, चिंता.
(१४)
मित्र
पाळा व जोडा :- कामाचे प्रकाराप्रमाणे योग्य त्या प्रकाशाची योजना
शत्रू
टाळा व फोडा :- अंधाऱ्या किंवा फार प्रखर प्रकाशात काम, दाट छाया किंवा डोळे दिपवणारा उजेड.
(१५)
मित्र
पाळा व जोडा :- पायापेक्षा जरा मोठी पादत्राणे
शत्रू
टाळा व फोडा :- घट्ट, फार सैल, फाटलेली किंवा फार झिजलेली पादत्राणे
(१६)
मित्र
पाळा व जोडा :- उन्हाळ्यात पांढरे, पातळ, सौम्य रंगाचे आणि सैलसर कपडे, तर हिवाळ्यत रंगीत जाड गरम आणि अंगाबरोबर बसणारे कपडे
शत्रू
टाळा व फोडा :- अस्वच्छ, न धुतलेले, आणि गबाळे कपडे, विलायती पद्धती कपड्यांचे अंधानूकरण.
(१७)
मित्र
पाळा व जोडा :- जेवणापूर्वी, शौच किंवा संडासानंतर, स्वयंपाकापूर्वी, खाण्याचे जिन्नस हाताळणे किंवा वाढण्यापूर्वी, रोग्याचे शुश्रुषेनंतर, किंवा केव्हाही हात रोगजंतूननी दुषित झाल्याची शंका असेल तेव्हा लगेच, दोन्ही हात साबण व भरपूर वाहत्या पाण्याने काळजीपूर्वक स्वच्छ धुणे.
शत्रू
टाळा व फोडा :- हात अस्वच्छ ठेवणे, आणि रोगांना आमंत्रण देणे, घाण हातांनी अन्न व इतर वस्तू दूषीत करणे आणी हातावरचे जंतू दुसरीकडे पसरवून रोग फैलविण्यात मदत करणे.
(१८)
मित्र
पाळा व जोडा :- दर १-२ वर्षांनी आरोग्य तपासणी करणे व आरोग्य सल्ला घेणे आणि आजारीपणात वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला व उपचार घेणे व अंमलात आणणे.
शत्रू
टाळा व फोडा :- अरोग्याबद्दल उदासीनता, रोग्यांचे कपडे, भांडी, निर्जंतुअक्न करता वापरणे, रोग अंगावर काढणे, डॉक्टरांना न सांगता इतरांचे ऐकणे, औषधोपचार टाळणे.
(१९)
मित्र
पाळा व जोडा :- धनुर्वात आणि इतर सांसर्गिक रोगांचे विरुद्ध योग्य त्या लसींचे ठराविक डोस नियमितपणे आणि कोष्टक किंवा सल्ल्याप्रमाणे घेणे.
शत्रू
टाळा व फोडा :- स्वतःला आणि इतर कुटुंबियांना रोग प्रतिबंधक लसीचे डोस घेणे टाळणे, मुलांना व इतरांना माहिती समजावून न सांगणे.
(२०)
मित्र
पाळा व जोडा :- आरोग्य शिक्षण, आरोग्याबद्दल आस्था, आणि कळकळ
शत्रू
टाळा व फोडा :- आरोग्याबद्दल हेळसांड आणि बेजबाबदारी.

ही यादी वाढवता येईल पण त्यामुळे खास फायदा होणार नाही. आरोग्य संवर्धणासाठी प्रत्येकाने आरोग्यशिक्षण घेणे क्रमप्राप्त आहे. अर्थात ते आचरणात आणले नाही तर ज्ञानाचा उपयोग आपल्या कामास येणार नाही. आपल्या डॉक्टरांचे पण मार्गदर्शन लागेल. तसेच सार्वजनिक आरोग्य व त्याबाबत आपल्या जबाबदाऱ्या ह्यांचे कडेपण दुर्लक्ष होता कामा नये. स्त्रियांना समाजात मानाचे व साजेसे स्थान दिले तरच त्या ‘शतायुषी’ होण्याचे फळ समाजाला आणि त्यातून राष्ट्राला मिळेल. ‘शतायुषी’ होण्याबरोबर त्यांचा आनंद कार्यतत्परता आणि प्रगती ह्याबरोबर संगम झाला पाहिजे. ही दोन महत्त्वाची सामाजिक अंगे संभाळली नाहीत तर मात्र “शतायुषी” होणेही एक आपत्ती होऊन बसेल. शंभर वर्षे भरणे आणि शतायुषी होणे ह्यातील निवड आपल्याच हातात आहे नाही का?