औदुंबर

ऎल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे

पायवाट पांधरी तयातून अडवी तिडवी पडे
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे

झाकळूनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर

One thought on “औदुंबर

Comments are closed.