१६ ऑगस्ट दिनविशेष

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १७७७ – अमेरिकन क्रांती-बेनिंगटनची लढाई – अमेरिकन सैन्याचा ब्रिटीश सैन्यावर विजय.
  • १७८० – अमेरिकन क्रांती-कॅम्डेनची लढाई – ब्रिटीश सैन्याचा अमेरिकन सैन्यावर विजय.
  • १८१२ – १८१२चे युद्ध – अमेरिकन सेनापती विल्यम हलने फोर्ट डेट्रोईट हा किल्ला न लढताच ब्रिटीश सैन्याच्या हवाली केला.
  • १८६५ – डॉमिनिकन प्रजासत्ताकला परत स्वातंत्र्य.
  • १८९६ – अलास्कातील क्लॉन्डाइक नदीच्या उपनदीत सोने सापडले. क्लॉन्डाइक गोल्ड रश सुरू.
  • १९६० – जोसेफ किटीन्जरने ३१,३३० मीटर (१,०२,८०० फूट) उंचीवरुन उडी मारली व विश्वविक्रम स्थापला.
  • १९६४ – व्हियेतनाम युद्ध – दक्षिण व्हियेतनाममध्ये क्रांती. जनरल न्विन खान्हने दुऑँग व्हान मिन्हला पदच्युत केले.
  • १९८७ – नॉर्थवेस्ट एरलाइन्स फ्लाइट २५५ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान डेट्रोइट विमानतळावर कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली.
  • २००५ – वेस्ट कॅरिबिअन एरवेझ फ्लाइट ७०८ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान व्हेनेझुएलातील माचिकेस विमानतळावर उतरताना कोसळले. १६० ठार.
  • १९९० – मध्यम पल्ल्याच्या ’आकाश’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली.

जन्म

  • १९१३ – मेनाकेम बेगिन, इस्रायेलचा पंतप्रधान.
  • १९४४ – मुफसिर उल-हक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९५० – जेफ थॉमसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९५२ – महेस गूणतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५७ – रणधीरसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मॄत्यु

  • १०२७ – जॉर्जि पहिला, जॉर्जियाचा राजा.
  • १४१९ – वेनेक्लॉस, बोहेमियाचा राजा.
  • १४४३ – आशिकागा योशिकात्सु, जपानी शोगन.
  • १७०५ – जेकब बर्नोली, स्विस गणितज्ञ.
  • १८८६ – श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी.
  • १९२१ – पीटर पहिला, सर्बियाचा राजा.
  • १९७७ – एल्विस प्रेसली, अमेरिकन गायक, अभिनेता.
  • १९७९ – जॉन डीफेनबेकर, कॅनडाचा तेरावा पंतप्रधान.
  • २००२ – अबु निदाल, पॅलेस्टाईनचा नेता.
  • २००३ – ईदी अमीन, युगांडाचा हुकुमशहा.