२० ऑगस्ट दिनविशेष

राजीव गांधी

राजीव गांधी

जागतिक दिवस

ठळक घटना

 • ६३६ : यार्मूकची लढाई. खालिद इब्ल अल-वालिदच्या नेतृत्त्वाखाली अरबांनी सिरिया व पॅलेस्टाइन जिंकले.
 • १००० : सेंट स्टीवनने हंगेरीचे राष्ट्र स्थापन केले.
 • १७७५ : स्पेनने तुसॉन, अ‍ॅरिझोना येथे किल्ला बांधून शहर स्थापले.
 • १७९४ : अमेरिकेच्या सैन्याने शॉनी, मिंगो, डेलावेर, व्यांडोट, मायामी, ऑटावा, चिप्पेवा आणि पोटावाटोमी जमातींचा पराभव केला.
 • १८६६ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अँड्रु जॉन्सनने अमेरिकन यादवी युद्ध अधिकृतरित्या संपल्याचे जाहीर केले.
 • १८८२ : पीटर इलिच त्चैकोव्सकीचे १८१२ ओव्हर्चर हे संगीत पहिल्यांदा मॉस्कोमध्ये वाजवले गेले.
 • १९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.
 • १९१४ : पहिले महायुद्ध – जर्मनीने ब्रसेल्स काबीज केले.
 • १९२० : नॅशनल फुटबॉल लीगची डेट्रॉइट येथे स्थापना.
 • १९२६ : जपान मध्ये निप्पॉन होसो क्योकैची स्थापना.
 • १९४४ : दुसरे महायुद्ध – रोमेनियाची लढाई सुरू.
 • १९५३ : सोवियेत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.
 • १९५५ : मोरोक्कोमध्ये ऍटलास पर्वतातून आलेल्या बर्बर सैनिकांनी ७७ फ्रेंच नागरिकांना ठार केले.
 • १९६० : सेनेगालने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.
 • १९६८ : २ लाख सैनिक व ५,००० रणगाड्यांसह सोवियेत संघ व इतर राष्ट्रांनी चेकोस्लोव्हेकियावर चढाई केली.
 • १९७५ : व्हायकिंग १चे प्रक्षेपण.
 • १९७७ : व्हॉयेजर १चे प्रक्षेपण.
 • १९८६ : एडमंड, ओक्लाहोमा येथे पोस्टाच्या कर्मचारी पॅट्रिक शेरिलने आपल्या १४ सहकर्मचार्‍यांची हत्या करून स्वतःला मारुन घेतले.
 • १९८८ : इराण-इराक युद्ध – आठ वर्षे चाललेल्या लढायांनंतर युद्धबंदी कायम.
 • १९९१ : एस्टोनियाने स्वतःला सोवियेत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.
 • १९९७ : सूहाने हत्याकांड – अल्जिरियामध्ये ६० व्यक्ती ठार. १५ अधिक व्यक्तींचे अपहरण.
 • १९९८ : ऑगस्ट ७ रोजी केन्या व टांझानियातील आपल्या वकीलातींवर झालेल्या हल्याचा वचपा म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानमधील अल कायदाच्या इमारतींवर क्रुझ प्रक्षेपणास्त्रांनी हल्ला केला. याच वेळी सुदानमध्येही हल्ला करण्यात आला.
 • २००८ : स्पानएर फ्लाइट ५०२२ हे माद्रिद पासून ग्रान केनेरियाला निघालेले विमान माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर धावपट्टीवरुन घसरले. १५३ ठार. १८ बचावले.
 • १८२८ : ब्राम्हो समाजाची स्थापना.
 • १९९७ : श्रीमती लता मंगेशकर यांना राजीव गांधी पुरस्कार.

जन्म

 • १७७९ : जोन्स जेकब बर्झेलियस, स्विस रसायनशास्त्रज्ञ.
 • १८३३ : बेंजामिन हॅरिसन, अमेरिकेचा २३वा राष्ट्राध्यक्ष.
 • १९०१ : साल्वातोरे क्वासिमोदो, नोबेल पारितोषिक विजेता इटालियन लेखक.
 • १९४१ : स्लोबोदान मिलोसेविच, सर्बिया आणि युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९४४ : राजीव गांधी, भारतीय पंतप्रधान.
 • १९४६ : एन.आर. नारायण मुर्ती, भारतीय उद्योगपती.
 • १२२१ – महानुभव पंथांचे संस्थापक चक्रधरस्वामी यांचा जन्म.

मृत्यु

 • १९८४ : पॉल डिरॅक, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९९७ : प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक.
 • १९९१ : गोपीनाथ मोहांती, उडिया लेखक.
 • २००१ : फ्रेड हॉयल, ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ.