६ ऑगस्ट दिनविशेष

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : बॉलिव्हिया, जमैका.

ठळक घटना

  • १५३८ : गाँझालो हिमेनेझ दि केसादाने कोलंबियामध्ये बोगोटा शहराची स्थापना केली.
  • १८०६ : शेवटच्या पवित्र रोमन सम्राट फ्रांसिस दुसर्‍याने पदत्याग केला व पवित्र रोमन साम्राज्याचा शेवट झाला.
  • १८२५ : बोलिव्हियाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
  • १८६१ : ब्रिटनने नायजेरियाचे लागोस शहर बळकावले.
  • १८९० : न्यू यॉर्कच्या ऑबर्न तुरुंगात विल्यम केमलरला विजेचे झटके देउन मृत्युदंड.
  • १९१४ : पहिले महायुद्ध – सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९१७ : पहिले महायुद्ध – माराशेष्टीची लढाई.
  • १९२६ : हॅरी हुडिनीने पाण्याखाली एका सीलबंद पेटीत ९१ मिनिटे राहून नंतर सुटका करून घेतली.
  • १९४५ : दुसरे महायुद्ध – अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर एनोला गे या नावाच्या विमानातून लिटल बॉय नाव दिलेला परमाणु बॉम्ब टाकला. अंदाजे ७०,००० क्षणात ठार तर अजून हजारो पुढील काही वर्षांत भाजल्याने व किरणोत्सर्गाने मृत्युमुखी.
  • १९६० : क्युबाची क्रांती – अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला उत्तर म्हणून क्युबाने अमेरिकेसह सगळ्या परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.
  • १९६२ : जमैकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९६६ : ब्रॅनिफ एरलाइन्स फ्लाइट २५० हे विमान नेब्रास्कातील फॉल्स सिटीजवळ पडले. ४२ ठार.
  • १९९० : पहिले अखाती युद्ध – कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.
  • १९९७ : कोरियन एरलाइन्स फ्लाइट ८०१ हे बोईंग ७४७-३०० प्रकारचे विमान गुआमच्या विमानतळावर उतरताना कोसळले. २२८ ठार.
  • १९४५ : हिरोशिमा दिन. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर जगातील पहिला अणुबॉंम्ब टाकला.
  • १९०६ : श्री. अरविंद घोष यांनी ‘वंदे मातरम’ हे नियतकालीक सुरु केले.

जन्म

  • ११८० : गो-तोबा, जपानी सम्राट.
  • १६९७ : चार्ल्स सातवा, पवित्र रोमन सम्राट.
  • १८०९ : आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन, इंग्लिश कवी.
  • १८८१ : अलेक्झांडर फ्लेमिंग, स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ.
  • १९१६ : दॉम मिंटॉफ, माल्टाचा पंतप्रधान.
  • १९२८ : अँडी वॉरहोल, अमेरिकन चित्रकार.
  • १९७० : एम. नाइट श्यामलन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
  • १९९० : जॉनबेनेट रामसे, अमेरिकन बालकलाकार.

मृत्यु

  • २५८ : पोप सिक्स्टस दुसरा.
  • ५२३ : पोप हॉर्मिस्दस.
  • १२७२ : स्टीवन पाचवा, हंगेरीचा राजा.
  • १४५८ : पोप कॅलिक्स्टस तिसरा.
  • १९७८ : पोप पॉल सहावा.
  • १९९१ : शापूर बख्तियार, इराणचा पंतप्रधान.
  • २००२ : एड्सगर डिक्स्ट्रा, डच संगणकशास्त्रज्ञ.
  • १९२५ : बंगालमधील प्रसिद्ध राजकारणी, जहाल गटांचे नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन.