९ ऑगस्ट दिनविशेष

जागतिक दिवस

  • राष्ट्र दिन : सिंगापुर.
  • राष्ट्रीय महिला दिन : दक्षिण आफ्रिका.
  • १९४२ : ऑगस्ट क्रांतीदिन.

ठळक घटना

  • १०४८ : २३ दिवस पोपपदी राहिल्यावर पोप दमासस दुसर्‍याचा मृत्यू.
  • ११७३ : पिसाच्या मिनार्‍याचे बांधकाम सुरू. बांधकाम संपण्यास २०० वर्षे लागलेला हा मिनारा चुकीने कलता बांधला गेला.
  • १८६२ : अमेरिकन यादवी युद्ध – सीडर माउंटनची लढाई.
  • १९०२ : एडवर्ड सातवा इंग्लंडच्या राजेपदी.
  • १९२५ : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लखनौजवळ काकोरी येथे रेल्वेगाडीची लूट
  • १९४२ : चले जाव आंदोलन – मुंबईत महात्मा गांधींना अटक.
  • १९४५ : जपानच्या नागासाकी शहरावर अमेरिकेने परमाणु बॉम्ब टाकला. ७०-९०,००० व्यक्ती काही क्षणांत ठार, असंख्य जखमी. इतर हजारो व्यक्ती पुढील काही वर्षात आजाराने मृत्युमुखी.
  • १९६५ : अमेरिकेतील लिटल रॉक, आर्कान्सा येथील क्षेपणास्त्र तळावर आग. ५३ ठार.
  • १९७४ : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनच्या राजीनाम्यानंतर जेरी फोर्ड राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९८७ : ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात १९ वर्षीय ज्युलियन नाइटने अंदाधुंद गोळ्या चालवुन ९ व्यक्तींना ठार मारले. इतर १९ जखमी.
  • १९८९ : कैफु तोशिकी जपानच्या पंतप्रधानपदी.
  • १९९३ : आल्बर्ट दुसरा बेल्जियमच्या राजेपदी.
  • २००० : अमेरिकेच्या बर्लिंग्टन, न्यू जर्सी शहराजवळ पायपर नवाहो व पायपर सेमिनोल प्रकारच्या विमानांची हवेत टक्कर. ११ ठार.
  • २००१ : इस्रायेलची राजधानी जेरुसलेममध्ये दहशतवाद्यांच्या बॉम्बहल्ल्यात १५ ठार व १३० जखमी.

जन्म

  • १९०२ : एडवर्ड क्लार्क, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९०९ : विनायक कृष्ण (व्ही.के.) गोकाक, कानडीभाषेतील लेखक
  • १९११ : खुरशेद मेहेरहोमजी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९१९ : जूप डेन उइल, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
  • १९२६ : डेव्हिड ऍटकिन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९३९ : रोमानो प्रोडी, इटलीचा पंतप्रधान.
  • १९५७ : मेलानी ग्रिफिथ, अमेरिकन अभिनेत्री.

मृत्यु

  • ११७ : ट्राजान, रोमन सम्राट.
  • ३७८ : व्हॅलेन्स, रोमन सम्राट.
  • ११०७ : गो-होरिकावा, जपानी सम्राट.
  • १२५० : एरिक चौथा, डेन्मार्कचा राजा.
  • १९०१ : विष्णुदास भावे, मराठी नाट्यपरंपरेचे जनक.
  • १९६२ : हर्मान हेस, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक.
  • १९६७ : ज्यो ऑर्टन, इंग्लिश लेखक.
  • १९६९ : सेसिल फ्रँक पोवेल, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.