आवळ्याचे लोणचे

साहित्य:

 • १/२ किलो आवळा
 • १ चिमटी हिंग
 • १ लहान चमचा जीरे
 • १ मोठा चमचा बडीशेप
 • १ मोठा चमचा मोहरी
 • १/२ लहान चमचा हळद
 • १/२ लहान चमचा कांद्याच्या बीया
 • १/४ लहान चमचा ओवा
 • २ लहान चमचे गरम मसाला
 • १/२ लहान चमचा काळे मीठ
 • २ लहान चमचे साधे मीठ
 • १/२ लहान चमचा सुकलेला पुदीना
 • २ मोठे चमचे व्हीनेगर
 • २ लहान चमचे साखर
 • १ वाटी सरसों तेल

कृती:

आवळ्याचे लोणचे

आवळ्याचे लोणचे

एका पातेल्यात आवळे, अर्धा चमचा मीठ, हळद व पाणी टाकून उकळा, आवळे थोडे कमी शिजवा, गॅस बंद करा. पाणी काढून आवळे सुकवा, जीरे, बडीशेप, मोहरी, ओवा व साखर मिक्सरमधून काढा. एका कढईत तेल गरम करा व सर्वमसाले आणि आवळे टाकून २ मिनीटे परता. आवळे गार झाल्यावर व्हीनेगर टाकून बरणीत भरा.