स्वयंपाकघरातील सावधानता

 1. रोज जरूर तपासून पहा-गॅस सिलेंडर गळत तर नाही ना. गॅसचा पाइप व्यवस्थित आहे का? पाईप दर ६ महिन्यात बदलला पाहिजे. कारण हवाच पाईपमुळे स्वयंपाकघरात अनेक अपघात होतात. पाइप तपासून पाहण्यासाठी साबणाचे थोडेसे पाणी पाईपवर टाकून पहा जर पाइप गळत असेल तर पाण्याचे बुडबुडे येतील.
 2. जर गॅस गळत असेल तर लगेच सर्व खिडकी-दरवजे उघडा व सिलेंडर चा खटका बंद करा! स्वयंपाकघरात कोणतेही ज्वलनशील वस्तू उपयोगात आणू नका.
 3. बर्नर तर ( गॅस शेगडीच्या तोंडावर ) कधीही कोळसा ठेऊ नका. यामुळे आग लागू शकते.
 4. कधीही ताटाने जलत असलेले गॅस चे बर्नर झाकू नये.
 5. जर तुम्ही स्टोव्ह वापरत असाल तर त्याला जास्त पंप घेऊ नका. नाहीतर तो खराब होईल.
 6. कुकर मध्ये स्वयंपाक करताना लक्ष ठेवा, पदार्थ पाण्याशिवाय शिजवू नका.
 7. शिट्टी लावल्याशिवाय कुकरमध्ये जास्तवेळ जेवण तयार करू नका, नाहीतर कुकर फाटेल.
 8. फ्रिज साफ करताना प्लग-होल्डर मधून काढून घ्या.
 9. साडी नेसून काम करताना पदर व्यवस्थित खोचून घ्या. ओढणी असेल तर सांभाळा.
 10. गॅसवरुन जड सामान उचलताना जाड कापडाचा वापर करा सांडशी घसरु शकते.
 11. चाकू, लाइटर, काडेपेटी, वगैरे लहान मुलांपासून लांब ठेवा.