बदामाची बर्फी

बदामाची बर्फी

बदामाची बर्फी

साहित्य:

  • २५० ग्रॅम बदाम
  • २५० ग्रॅम खवा
  • अर्धा कप तूप
  • २५० ग्रॅम साखर
  • २ चांदी वर्ख

कृती:

बदाम ६-७ तास पाण्यात भिजवून ठेवावे. नंतर त्यांना सोलून बारीक वाटून घ्यावेत. एका कढईत खवा टाकून हलकासा भाजावा व काढून बाजूला ठेवावा. आता कढईत तूप व वाटलेले बदाम टाकून भाजावे. भाजून तूप सुटल्यावर त्यात खवा मिसळावा व नंतर चूली वरून काढून घ्यावे. एका वेगळ्या भांड्यात साखर व १ कप पाणी टाकून उकळावे. घट्ट पाक झाल्यावर गॅस बंद करावे. यात बदाम खव्याचे मिश्रण मिसळावे. एका ताटात तूप लावून हे मिश्रण पसरावे. वरून चांदी वर्ख लावावा. बर्फीच्या आकारात कापून घ्यावे.