शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे आयसीयू मध्ये

बाळ ठाकरे

बाळ ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांना बुधवारी लीलावती हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलविण्यात आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तातडीने हॉस्पीटलमध्ये पोहोचले.

त्यांनी बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बाळासाहेब यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे मंगळवारी हॉस्पीटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते.

डॉक्टरांनी नियमित वैद्यकीय चाचण्यांसाठी त्यांना दोन दिवस हॉस्पीटलमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना आयसीयूत हलविण्यात आल्याचे वृत्त समजले.

बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिवसैनिकांनी हॉस्पीटलबाहेर मोठी गर्दी केली होती.