बटाटा चकल्या

साहित्य

  • बटाटे
  • हिरव्या मिरच्या
  • मीठ
  • कोथिंबीर
  • तीळ
  • डाळीचे पीठ

कृती

बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. त्यात वाटलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडेसे तीळ घालून मळा. घट्ट होण्यासाठी थोडे डाळीचे पीठ घाला.नंतर मळून चकल्या करा.
उपासाला हव्या असतील तर तीळ व कोथिंबीर घालू नये. जिरे घाला व उपासाची भाजणी किंवा शिंगाड्याचे मीठ घालून करा.