बटाट्याचा बदामी हलवा

साहित्य :

  • १ वाटी बटाट्याचे सत्व ( तवकीर)
  • २ वाट्या साखर
  • १ लिंबाचा रस
  • थोडे काजू
  • बदामाचे कप
  • खायचा पिवळा रंग
  • ४ वेलदोड्याची पूड
  • २ टे. चमचा तूप.

कृती :

जाड बुडाच्या पातेल्यात साखर व २ वाट्या पाणी एकत्र करून गॅसवर ठेवा. बटाट्याच्या सत्वात १ वाटी पाणी घालून सारखे करा. पाकामध्ये लिंबाचा रस, काजू बदामाचे काप, वेलदोड्याची पूड व रंग घाला. पाक जरा उकळला की त्यात पाण्यात कालवलेले बटाट्याचे सर्व घाला. घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. नंतर कडेने तूप सोडा. गोळा जमू लागला व कडेने तूप सुटू लागले की उतरवा व तूप लावलेल्या थाळीत ओता व थापा. हाहलवा पारदर्शक दिसतो.