बटाट्याचा पराठा

साहित्य:

  • अर्धा किलो पीठ
  • पाव किलो बटाटे
  • १ कांदा
  • मीठ
  • १ चमचा तिखट
  • १ चमचा धणे पावडर
  • १ चमचा वाटलेली शोप
  • अर्धा चमचा आमचूर
  • तूप गरजेप्रमाणे

कृती:

बटाट्याचा पराठा

बटाट्याचा पराठा

पीठ गाळून मीठ टाकून कणीक तिंबून घ्या. बटाटे उकडून कुसकरुन घ्या. त्यात तिखट, धणे पावडर, शोप, आमचूर व मीठ टाकून मिसळा. कणकेचा गोळा बनवून मध्ये थोडे तूप व बटाट्याचे मिश्रण भरा व तोंड बंद करा व लाटून जाड पोळ्या करा. गरम तव्यावर शेका. तूप टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित शेका. सगळ्या पीठाचे याच प्रकारे बटाटे भरून पराठे तयार करा. हिरव्या कोथिंबीरच्या चटणीसोबत वाढा.