बटाट्याचे पुडिंग

साहित्य :

  • ५०० ग्रॅम बटाटे
  • २५० ग्रॅम साखर
  • १०० ग्रॅम खवा
  • अर्धी वाटी तूप
  • २-३ वेलदोडे पूड
  • २ चिमट्या केशर
  • १ वाटी ओले खोबरे.

कृती :

बटाट्याचे पुडिंग

बटाट्याचे पुडिंग

केशर गरम करून खलावे व थोड्या गरम पाण्यात शिजत ठेवावे. बटाटे उकडून सोलावे व गरमच असताना पुरणयंत्रात घालून बारीक करावे किंवा किसणीने किसावे.

साखरेत अर्धा वाटी पाणी घालून चुलीवर ठेवावे व दोनतारी पाक करावा.जाड बुडाच्या पातेल्यात तूप तापले की त्यावर बटाट्याचे मिश्रण परतावे.

भिजलेले केशर पाकात घालावे व पाक बटाट्यावर ओतावा. खवा मोकळा, कुस्करून घालावा मिश्रण सारखे होईपर्यंत सतत ढवळावे. खाली उतरवून सुबकशा भांड्यात घालावे. वरून वेलदोडे पूड व असल्यास थोडे ओले खोबरे घालावे.

लहान मुलांसाठी व उपासवाल्या मंडळीसाठी एक वेगळा पदार्थ !