बटाट्याचे रायते

साहित्य :

  • ५०० ग्रॅम ताजे गोड दही
  • ३ मध्यम बटाटे
  • पाऊणवाटी ओला नारळ
  • अर्धा चमचा जिरे
  • अर्धा चमचा मोहरी
  • १॥ चमचा मीठ

फोडणीसाठी :

  • ३ चमचे तेल
  • १ चमचे उडदाची डाळ
  • पाव चमचा मोहरी
  • २ हिरव्या मोरच्या
  • १०-१२ कढीलिंबाची पाने
  • १ चिमूट हिंग
  • २ चमचे कोथिंबीर

कृती :

बटाटे उकडून सोलून बारीक चिरावे. दही पाणी न घालता घुसळावे. त्यात बटाटे व नारळ घालावा. जिरे व मोहरी छोट्या कढईत कोरडी भाजावी व लाटण्याने त्याची पोळपाटावर भरड पूड करावी. मीठ व ही पूड दह्यात घालावी. तेल तापवून अनुक्रमाने डाळ, मोहरी, हिरव्या (उभ्या चिरलेल्या) मिरच्या, कढीलिंब व हिंग घालून फोडणी करावी व रायत्यावर घालावी. हे रायते सोपे व पुरवठ्याचे आहे.