बटाट्याची भाजी(दही घालून)

साहित्य :

 • २५० ग्रॅम बटाटे
 • दीड वाटी ताजे दही
 • ४ चमचे तेल
 • ३ हिरव्या मिरच्या
 • २ चमचे बारीक चिरलेला कांदा
 • ५-६ लसूण पाकळ्या
 • १ सेंमी. आल्याचा तुकडा
 • अर्धा चमचा जिरे
 • ४ चमचे तेल
 • अर्धा चमचा गरम मसाला
 • ५-६ काजूचे बारीक काप ( ऐच्छिक)
 • २ चमचे शेंगदाण्याचे भरड कूट
 • ६-७ कढीलिंबाचे पाने

कृती :

बटाटे उकडून सोलावे व बेताचे तुकडे चिरावे. मिरच्या लसूण व आले बारीक चिराव्या. एका पातेल्यात तेल तापले की त्यावर जिरे, कढीलिंबाची पाने, लसूण, कांदा व मिरच्या घालून बदामी रंग येईपर्यंत परतावे. त्यात बटाटे घालून परतावे. ३-४ मिनिटे ढवल्यानंतर घुसळलेले दही घालावे व झांकण ठेवावे. आंच मंद ठेवावी. ३-४ मिनिटे खदखदू द्यावे. नंतर मीठ, मसाला, दाणेकूट, काजूचे काप घालावे व ३-४ मिनिटे चुलीवर ढवळून खाली उतरवावे. आवडीनुसार वरून कोथिंबीर शिवरावी व भाजी वाढावी.