बटाट्याच्या पुर्‍या

साहित्य :

  • ३ वाट्या मैदा किंवा मैदाच्या चाळणीने चाळलेले कणिक
  • एक वाटी दही
  • २ वाट्या उकडलेल्या बटाट्यांचा लगदा
  • २ चमचे मीठ
  • १ चमचा जिरेपूड
  • तळण्यासाठी तेल

कृती :

बटाट्याच्या पुर्‍या

बटाट्याच्या पुर्‍या

बटाटे उकडून गरम असताना त्याचा लगदा पूरणयंत्रावर करावा किंवा किसनीने किसावा.

त्यात कणिक, मीठ व जिरेपूड घालावी. दही घालावे व लागेल तसे पाणी घालून पुर्‍यांसाठी पीठ मळावे.

तेलाचा हात लावून कणिक मळतो तसे मळून घ्यावे. परातीला पीठ चिकटता कामा नये.

याच्या बेताच्या आकाराच्या पुर्‍या लाटून तळावे व लोणचे, चटणी किंवा मुरंब्याशी खायला द्याव्या.