बेळगाव कर्नाटकाचेच

 जगदीश शेट्टर

जगदीश शेट्टर

बेळगाव हे कर्नाटकचेच असून सीमावाद हा विषय बंद झाला आहे, कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट केले. असे वक्तव्य करुन महाराष्ट्र विधिमंडळाने केलेला निषेध त्यांनी फेटाळून लावला आहे. त्यांनी मुखलाशीही केली की, मराठी मंडळी कर्नाटकात सुरक्षित असून सौहार्दाने राहत आहेत.

‘कर्नाटकातील मराठी मंडळी इतर राज्यांमध्ये राहत असलेल्या मराठी मंडळी अधिक सुरक्षित आहेत. सौहार्दाचे वातावरण सीमाभागातही आहे. त्यामुळे हे प्रकरण महाराष्ट्राने वारंवार उकरुन काढू नये,’ असे ते म्हणत होते. चार वर्षातील तिसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी दावा केला की, बेळगाव महापालिका बरखास्त करण्याचा कायद्यानुसारच निर्णय आहे.