बेलफळाचे सरबत

साहित्य :

  • बेलफळातील गर १ वाटी
  • १ वाटी साखर
  • १ लिंबू
  • २ वेलदोडे
  • मीठ

कृती :

पिकलेली बेलफळे घ्यावीत. ती ३-४ तास पाण्यात भिजत घालावीत. त्यातील गर काढून कुस्करून घ्यावा. त्यात साखर, मीठ, वेलची पूड, लिंबू रस घालून परत गाळावे. सरबत प्यायच्या वेळी पाणी व बर्फ घालावे. हे सरबत टिकाऊ नाही ते लगेचच संपवावे लागते.

One thought on “बेलफळाचे सरबत

  1. आदित्य जाधव

    बेलफळाचा जूस खूपच छान लागतो. मोसंबी खस वाळा मिक्स वाटतो. :)
    :) :) :) म्हणजे ज्याला बेलफळाचा जूस माहित नाही त्याला त्याची चव मिक्स लागते वर सांगितल्याप्रमाणे :P

Comments are closed.