भक्ताने केले शनिदेवांना प्रसन्न

शनिशिंगणापूर येथील शनिदेव

शनिशिंगणापूर येथील शनिदेव

शनिशिंगणापूर येथील शनिदेवाची महिमा आता सातासमुद्रापारही पोचली आहे. याचा पुरावा म्हणजे एका पाश्चात्य भक्ताने काल शनिदेवाला एक सोन्याचे मुकुट अर्पण केले जो दीड कोटी रुपयांचा आहे व त्याचे वजन साडेचार किलो आहे. त्या मुकुटावर शनिदेवाचा चेहरा व मोठे ‘निलम’ रत्न बसविण्यात आले असून, त्यावर सुंदर कलाकुसर आहे. गावकर्‍यांनी हा मुकुट पाहण्यासाठी आज गर्दी केली होती. भविकाच्या इच्छेनुसार त्याची गुप्तता पाळली आहे. दान करणार्‍याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.