भरलेली शिमला मिरची

साहित्य:

  • शिमला मिरची
  • ३ उकडलेले बटाटे
  • अर्धा कप वाटाणे
  • एक टोमॅटो
  • सुके मसाले
  • तूप इच्छेनुसार
  • कांदा

कृती:

भरलेली शिमला मिरची

भरलेली शिमला मिरची

शिमला मिरची पोकळ करून पाण्यात उकळवून घ्यावी. उकळल्यानंतर शिमला मिरची उलटी ठेवावी म्हणजे पाणी निघून जाईल.

आता एका कढईत एक पळी तूप टाकून जिरे भाजावे. दिड चमचा मीठ, २ चमचे धणे, एक चमचा हळद, १/२ चमचा तिखट, २ चमचे खटाई टाकुन भाजावे.

उकळलेले बटाटे व उकळलेले वाटाणे टाकुन हलवावे. टोमॅटो टाकावे व चांगल्या तर्‍हेने फेटावे मिश्रण बिलकुल सुके झाले पाहिजे.

आता शिमला मिरचीत हे मिश्रण चांगल्या तर्‍हेने दाबून दाबून भरावे.

आता एक कढईत तूपात शिमला मिरची तळावी. पाहिजे तर ओव्हन मध्ये बेक करावी.