भरली वांगी

साहित्य :

  • अर्धा किलो लहान वांगी
  • २ चमचे लाल तिखट
  • ४ चमचे गोडा मसाला
  • ४ चमचे दाण्याचे कूट
  • अर्धी वाटी किसलेले खोबरे
  • लिंबाएवढा गूळ
  • कोथिंबीर
  • १ चमचा मीठ
  • फोडणीचे साहित्य

कृती :

वांगी देठाकडून चिरावीत व ४ भाग करावेत (मसाला आत शिरण्यासाठी) २ चमचे तेल घेऊन तिखट, दाण्याचे कूट, गोडा मसाला, किसलेले खोबरे, गूळ, मीठ, कोथिंबीर एकत्र करावे. जेवढी वांगी असतील तेवढे मसाल्याचे ढीग करून प्रत्येक वांग्यात १ ढीग भरावा. ही भरलेली वांगी फोडणीला टाकताना त्यात १ भांडे गरम पाणी टाकावे. वांगी मऊ होईपर्यंत म्हणजे साधारणतः १० मिनिटे मंदाग्निवर शिजू द्यावीत. ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यास ही भाजी चांगली लागते.