भारतीय चित्रपटाचे म्युझिक लॉंच

भारतीय चित्रपटाचे म्युझिक लॉंच

पुण्यातील कोथरुड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आज ‘भारतीय’ या चित्रपटाचे म्युझिक लॉंच करण्यात आले. या कार्यक्रमात ‘भारतीय’ चित्रपटाचे निर्माते अभिजीत घोलप यांनी चित्रपटाच्या निर्मितीबद्दल थोडी माहिती दिली. पटकथाकार अनिरुद्ध पोतदार यांनी चित्रपटाच्या कथेविषयी सांगितले. ‘भारतीय’ चित्रपटाचे दिग्दर्शक गिरिश मोहिते यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कलाकारांच्या अभिनयाबद्दल प्रेक्षकांना सांगितले. त्यानंतर अभिनेत्री तेजश्री हीने ‘अई यई यो’ या चित्रपटातल्या गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर प्रत्येक कलाकाराने या चित्रपटाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. चित्रपटाच्या सेटवर केलेली धमालही कलाकारांनी सांगितली. त्यानंतर गायक नंदेश उमप यांनी आपल्या दणदणीत आवाजात पोवाडा सादर करुन प्रेक्षकांना भारावून टाकले. गायक कुणाल गांजावाला यांनी आपल्या सुरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सर्वांचे आवडते ‘स्टार संगीतकार’ अजय-अतुल यांनी या चित्रपटातल्या गाण्यांबद्दल सांगितले. त्यानंतर या चित्रपटाचा म्युझिक लॉंच करण्यात आला. अरुण नुलकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या तिकीटाबरोबर चित्रपटाची ऑडीयो सी.डी प्रेक्षकांना देण्यात आली.

या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, कुलदीप पवार, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, हृषिकेश जोशी, मीता सावरकर, तेजश्री, संगीतकार अजय-अतुल, गीतकार संदीप खरे, गायक नंदेश उमप आणि कुणाल गांजावाला, ‘भारतीय’ चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते, निर्माता अभिजीत घोलप, पटकथाकार अनिरुद्ध पोतदार आदी उपस्थित होते. देविशा फिल्म्स निर्मित ‘भारतीय’ हा चित्रपट येत्या १० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे

भारतीय म्युझिक लॉंच फोटो