बीटाच्या वड्या

साहित्य :

  • २ वाट्या बीटचा कीस
  • दीड वाटी साखर
  • १ वाटी दूध
  • अर्धी वाटी मिल्क पावडर
  • ३ चमचा ड्रिकींग चॉकलेट

कृती :

बीटाच्या वड्या

बीटाच्या वड्या

प्रथम बीटचा कीस शिजवावा.

नंतर दूधाची पावडर, ड्रिकींग चॉकोलेट व साखर एकत्र करून घ्या व बीटच्या किसात घालून शिजवा.

मिश्रण घट्ट होत आले की उतरवा.

डावेने घोटा.

नंतर थोडीशी पिठीसाखर घालून घोटा व तूप लावलेल्या ताटात थापा व वड्या पाडा.