आपल्या कविता,लेख,पाककृती मराठीमातीवर प्रसिद्ध करा, आजच आपले साहित्य पाठवा.

बुंदीचे लाडू

साहित्य :

  • २५० ग्रॅम डाळीचे पीठ (मोठ्या अडीच वाट्या)
  • २५० ग्रॅम तूप
  • ३५० ग्रॅम साखर
  • दीड वाटी पाणी (पीठ भिजवण्यासाठी)

कृती :

बुंदीचे लाडू

बुंदीचे लाडू

डाळीचे पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या. नंतर त्यात १ टेबलचमचा कडकडीत तुपाचे मोहन घालावे व पीठ भिजवावे.

गुठळी राहू देऊ नये. भज्याचा पिठाइतपत असावे. नंतर कढईत तूप तापत ठेवावे व बुंदीच्या झाऱ्यावर वरील पीठ थोडे घालून झारा ठोकून बुंदी पाडाव्या.

कढईजवळ कढईच्या उंचीपेक्षा जरा उंच येईल असा पाठ धरावा. पाटावर झारा ठोकावा.

लालसर रंगावर आल्या की बुंदी काढाव्या अशा सर्व बुंदी पाडून घ्याव्या.

प्रत्येक वेळी झारा पाण्याने साफ करून घ्या.

साखरेत पाणी घालून एकतारीपेक्षा जरा जास्त असा पाक करावा.

पाकात बुंदी टाकाव्या. नंतर बुंदी पाकात मुरल्यावर लाडू वळावे.

वर्ग: , , , , ,

प्रतिक्रिया द्या

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *

*
*