ब्रेड कटलेट

साहित्य:

  • १० स्लाइस ब्रेड
  • ४ हिरव्या मिरची
  • १/२ कप कोथिंबीर
  • १ तुकडा आले
  • मीठ चवीनुसार
  • १०० ग्रॅम चीज
  • तळण्याकरता तेल

कृतीः

ब्रेड कटलेट

ब्रेड कटलेट

हिरवी मिरची व आले बारीक वाटून घ्या. कोथिंबीर बारीक चिरा, १ चीज किसणीने किसून घ्या.

ब्रेड चे स्लाइस पाण्यात बुडवून लगेच काढून घ्या. हाताने दाबुन त्याचे पाणी काढून त्यांना हातने कुचकरा त्याच्यात हिरव्या मिरची, कोथिंबीर, आल, मीठ, मिसळून एकत्र करा.

आता थोडेसे मिश्रण हातावर घ्या त्याच्या मधोमध चीज ठेऊन परत बंद करा. चपटे लहान-लहान कटलेट तयार करा. एका कढईत तेल गरम करून कटलेट तळून घ्या. गरम-गरम कटलेट टमाटर सॉस व हिरव्या चटणी बरोबर वाढा.