ब्रेडची शेव

साहित्य :

  • २ वाट्या ब्रेडचा चुरा
  • २ वाट्या पातळ पोहे किंवा पोह्याचा चुरा
  • मीठ
  • मिरपूड
  • ओवा.

कृती :

ब्रेडच्या कडा काढून घ्याव्या व मिक्सरवर त्याचा चुरा करावा. पोहेही मिक्सरमधून काढा.
नंतर दोन्ही एकत्र करून कोमट पाण्याने भिजवावी व तेलात शेव पाडावी.