बुंदीचे लाडू

साहित्यः

  • ५०० ग्रा. बेसन
  • ५०० ग्रा. साखर
  • १ चुटकी बेकिंग पावडर
  • १ छोटा चमचा सफेद विलायची पावडर
  • २ मोठे चमचे तूप भाजण्यासाठी
  • १/२ ग्रा. केशर

कृतीः

बेसन आणि बेकिंग पावडर मिळवावी आणि चाळुन २ मोठे चमचे तुपात आणि दुधात मिळवून एकत्र करावे. भाजण्यासाठी कढईत तूप घेऊन गरम करावे. एक चालनी द्वारा बेसनाचे मिश्रण गरम तूपात मळावे ( एका चमचाने बेसनाचे मिश्रण हलवावे) बुंदिस सोनेरी तळावे तळल्यानंतर झाऱ्याद्वारे काढावे २५० ग्रा. साखर पाण्यात मिळवून पाक बनवावा पाक तीन तार सारखी झाली पाहिजे. त्यात सफेद विलायची पावडर आणि केसर मिळवावे गरम बुंदिस पाकात टाकुन चांगल्या तऱ्हेने मिळवावे. थोडे थंड झाल्यावर छोटे छोटे लाडू बनवावे. थंड करून घ्यावे.