बटर स्कॉच आईस्क्रिम

साहित्य:

  • २ किलो दूध
  • १६० ग्रॅम मिल्क पावडर
  • २ कप ताजे क्रीम
  • २ कप साखर
  • २५ ग्रॅम लोणी

कृती:

बटर स्कॉच आईस्क्रिम

बटर स्कॉच आईस्क्रिम

दूधात मिल्क पावडर व अर्धा कप साखर टाकून ढवळा. आटल्यावर गॅस बदं करा. अर्धा कप साखर एका पॅन मध्ये टाकून गरम करा. गाढ झाल्यावर त्यात लोणी मिसळा. सारखे हलवत रहा. आता यात घट्ट केलेले दूध टाकून उकळा. उकळी आल्यावर गॅस बंद करा. थंड झाल्यावर क्रीम मिसळा व जमवायला फ्रीज मध्ये ठेवा. अर्धे जमल्यावर मिक्सर मध्ये फेटा व परत जमवायला ठेवा.