चकल्या

साहित्य :

  • २ फुलपात्रे तांदूळ
  • १ फुलपात्र हरबऱ्याची डाळ
  • १ फुलपात्र उडदाची डाळ
  • ३ पळ्या (लोखंडी) तेलाचे मोहन
  • ३ चहाचा चमचा मीठ
  • १ टे. चमचा हळद
  • अर्धी वाटी तिखट
  • २ चहाचा चमचा पांढरे तीळ.

कृती :

एकेक धान्य कढईत मंदाग्निवर भाजावे. नंतर गिरणीतून ही भाजणी दळावी. वरील भाजणी साधारण ९ वाट्या भरते.भाजणी एखाद्या मोठ्या पातेलीने मोजावी. जितक्यास तितक्यापेक्षा थोडे कमी पाणी उकळण्यास ठेवा. पातेले मोठे असावे. नंतर ह्या पाण्यातच ३ पळ्या तेल घाला. गरम करू नये. हळद, तिखट, मीठ घाला. पाण्याला उकळी आली की खाली उतरवून त्यात माजणी घाल. पळीच्या टोकाने नीट ढवळून झाकावी. दोन तासांनी भाजणी चांगली मळावी व चकल्या करून तळाव्या. वरील प्रमाणात ७५ ते ८० चकल्या होतात.