चमचम

साहित्य:

  • १ किलो गाईचे दूध
  • १/२ चमचा टाटरी
  • दीड किलो साखर
  • दोन रीठा
  • १ चिमूट हायड्रो पावडर
  • २५० ग्रॅम मावा
  • २ चांदी वर्ख
  • ६ बदाम

कृती:

चमचम तयार करण्यासाठी गाईचे दूधच कामी घ्यावे. एक कप गरम पाण्यात टाटरी मिसळून वेगळी ठेवावी. दूध उकळायला ठेवा. उकळी आल्यावर टाटरी हळू हळू दूधात टाकत जावी. दूध फाटल्यावर टाटरी टाकणे बंद करावे. फाटलेले दूध गाळून पातीवेगळे करून घ्यावे. छेन्याचे गोल रसगुल्या सारखे आकाराचे करावे व दाबून चपटे करावे. एक भांड्यात १ लीटर पाणी व १ किलो साखर उकळावी. एक वेगळ्या भांड्यात अर्धा लीटर पाणी व २ रिठे उकळावे. आता या दोघांना उकळी आल्यावर रिठ्याचे पाणी पाकात मिसळावे. यात रसगुल्ले पण टाका. २० मिनिट गरम करून गॅस बंद करावा. आता एका भांड्यात अर्धा किलो साखर व एक कप पाणी टाकून उकळा. एक चिमूट हायड्रो पावडर पण मिसळा. २-३ उकळ्या आल्यावर गॅस बंद करा. रसगुल्ले पाकातून काढून या नवीन पाकात टाका. थोडा वेळाने काढून घ्या व यांना आडवे कापा. मावा किसून त्यात पाक मिसळा. खालच्या भागावर मावा लावा. वर कापलेला भाग ठेवा व वरून चांदी वर्ख लावा. एक-एक बदाम चमचम वर लावा.