चतुर स्त्री

एका स्त्रीची, ती फार चतुर असून तिला भूतभविष्यवर्तमान समजते अशी प्रसिध्दि होती. पुढे काही दिवसांनी तिजवर चेटुक केल्याचा आरोप येऊन तिला फाशीची शिक्षा झाली. ठरलेल्या दिवशी तिला फाशी देण्याच्या ठिकाणाकडे चालविली असता, रस्त्यातली एक स्त्री तिला म्हणाली, ‘बाई, लोकांचे बरे वाईट करविण्याविषयी तुला जर देवाचे मन वळविता येत होते, तर आता ज्या न्यायाधीशांनी तुला ही शिक्षा दिली, ते माणूस असता, त्यांचे मन तुला वळविता येऊ नये हे आश्चर्य नव्हे काय ?’