चिकन बिरयानी

चिकन बिरयानी

चिकन बिरयानी

साहित्यः

 • ६७५ ग्रा. चिकन तुकडे
 • १॥ कप बासमती तांदूळ
 • २ मोठे चमचे तेल
 • १ कापलेला कांदा
 • २ कांडी लसूण सोललेली
 • १ हिरवी मिरची कापलेली
 • १ तुकडा आले कापलेले
 • २ चमचे चिकन मसाला
 • १ चमचा मीठ चवीनुसार
 • १/२ चमचा गरम मसाला
 • ३ कापलेले टोमॅटो
 • १/२ चमचा हळद
 • २ तेजपत्ते
 • ४ छोटी वेलची
 • ४ लवंग
 • १ चमचा केसर

साहित्यः

तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवावे. एका कढईत तेल गरम करून कांदा भाजत नंतर लसुण, आले व हिरवी मिरची टाकुन दोन मिनीट फ्राय करावे चिकन टाकावे व ३ मिनीट फ्राय करावे.

चिकन मसाला मीठ आणि गरम मसाला टाकुन ५ मिनीट फ्राय करावे नंतर टोमॅटो टाकुन ३-४ मिनीट अजुन भाजावे नंतर उतरवुन एका बाजुला ठेवावे.

एका दुसर्‍या कढईत तांदूळ, ३ कप पाणी हळद, तेजपान, वेलची, लवंग आणि केसर टाकुन पाणी सुकेपर्यंत शिजवावे. शिजलेल्या तांदळात चिकन टाकुन अलगद मिळवावे आणि कमी गॅसवर ८-१० मिनीट ठेवावे गॅस बंद करावा  व ८-१० मिनीटानंतर खावे.

1 thought on “चिकन बिरयानी

Comments are closed.