चिकन करी स्पेशल

साहित्यः

 • ६२५ ग्रा. चिकन पीस
 • ४ मोठे चमचे तेल
 • ६ करी पत्ते
 • १/४ चमचा कलौजी
 • १/४ चमचा सरसो
 • ८ कापलेले टोमॅटो
 • १ चमचा वाटलेले धणे
 • १ चमचा मिरची
 • १ चमचा मीठ
 • १ चमचा वाटलेली जीरे
 • १ चमचा लसणाची पेस्ट
 • ३/४ कप पाणी
 • १ मोठा चमचा भाजलेले तीळ
 • २ चमचा कोथंबीर

कृतीः 

एका कढईत तेल, गरम करून पहिले करी पत्ते फ्राय करावे नंतर कलौजी व सरसो भाजावे गॅस कमी करून टोमॅटो टाकावे व २ मिनीट फ्राय करून वाटलेले दणे मिरची, मीठ वाटलेले जीरे व लसूण टाकावे चिकन पीस टाकावे आणि हलवत रस्सा घट्ट होईपर्यंत व चिकन गळेपर्यंत शिजवावे तिळ व कोथंबीर टाकावे व सर्विंग डिश काढुन साध्या भाताबरोबर गरम गरम खावे.